मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असून रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच कोरोनामुळे काही जणांचा मृत्यूही होत आहे. कोरोनामुळे पालिकेच्या रुग्णालयात होणारे मृत्यू रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी'ची घोषणा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूचे फॉरेन्सिक व्हिडिओ ऑडिट करण्यात यावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी रुग्णालयांना दिले आहेत.
मुंबईत कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी 'सेव्ह लाईव्ह स्ट्रॅटेजी' - मुंबई कोरोना व्हायरस बातमी
मुंबईत सध्या कोरोनाचे 76 हजार 294 रुग्ण असून 4 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिका रुग्णालयात येणारे अनेक रुग्ण हे प्रकृती गंभीर असलेले असतात. त्यामुळे गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत. यासाठी त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचे 76 हजार 294 रुग्ण असून 4 हजार 461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिका रुग्णालयात येणारे अनेक रुग्ण हे प्रकृती गंभीर असलेले असतात. त्यामुळे गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत. यासाठी त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. रुग्णाच्या प्रकृतीबाबत वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांनी दिवसातून दोन वेळा व्हिडिओ किंवा दूरध्वनीवरून चर्चा करावी. रुग्णाची काळजी घेताना डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी टीम म्हणून काम करावे. रुग्णाच्या उपचारात कोणतीही कसर राहू नये म्हणून फाईल आणि केसपेपरवरील सर्व नोंदी डॉक्टरांनी वाचाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या रुग्णांचे बहुतेक मृत्यू हे ऑक्सिजन काढल्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान रुग्ण ऑक्सिजन काढून शौलायत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी अनेक रुग्ण कोसळतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णांना बेडवरच पॉट देण्यात यावे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुठ्याचे पॉट देऊन रुग्णांची सेवा करावी. अँटीव्हायरल, स्टेरॉईड आदी औषधे, इंजेक्शन तसेच प्लाझ्माचा साठा योग्य प्रकारे असावा व त्याचा वापर करावा. रुग्णांवर उपचार करताना कोणत्याही प्रकारे वेळ वाया घालवू नये, रुग्णालयांच्या प्रमुखांनी किंवा विभाग प्रमुखांनी व्हिडिओद्वारे प्रत्येक रुग्णाची तपासणी करावी. कोरोनामुळे होणाऱ्या प्रत्येक मृत्यूचे फॉरेन्सिक व्हिडिओ ऑडिट करण्यात यावे, असे आदेश पालिका आयुक्तांनी रुग्णालयांना दिले आहेत.