मुंबई -पूरपरिस्थितीवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पुरामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून, या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार असल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले.
पुरस्थितीला भाजप सरकारच जबाबदार, सत्यजीत तांबेंचा निशाणा
पूरपरिस्थितीवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पुरामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले असून, या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार असल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले.
सत्यजीत तांबेंचा भाजपवर निशाणा
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. या पुरामध्ये ३० च्या वर लोकांचा मृत्यू झला आहे. किती लोकं बेघर झालेत? किती जमीन खराब झाली? पिकांचं किती नुकसान झालं?किती जनावरं दगावलीत? याची सरकारकडे काहीही ठोस माहिती नसल्याचे सत्यजीत तांबे म्हणाले. हे सगळं भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे तांबे म्हणाले.