महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जे मिळवायचे ते आत्ताच मिळवा, विसंबून राहू नका,  सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला - सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना एक मैत्रीपूर्ण राजकीय सल्ला दिला आहे. राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधी पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही, अशी पोस्ट तांबेंनी फेसबुकवक शेअर केली आहे.

सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

By

Published : Oct 28, 2019, 11:56 PM IST

Updated : Oct 29, 2019, 1:27 PM IST

मुंबई - महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना एक मैत्रीपूर्ण राजकीय सल्ला दिला आहे. राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधी पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही, अशी पोस्ट तांबेंनी फेसबुकवर शेअर केली आहे. आलेली संधी सोडू नका असे म्हणत तांबेंनी आदित्य यांना मुख्यमंत्री पदाबाबत ठाम राहण्याचा सल्ला दिला आहे.

अडीच-अडीच वर्षांच्या निमित्ताने...असे म्हणत तांबोंनी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी स्वत: चा स्वानुभव कथन केला आहे. जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती, असे त्यांनी म्हटले आहे.

सत्यजीत तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

सत्यजीत तांबेंनी एक स्वानुभव या पोस्टमध्ये सांगितला आहे. 2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र, जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र, सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणू लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या.

पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला.

हे सर्व सांगण्याचा खटाटोप यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती.

Last Updated : Oct 29, 2019, 1:27 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details