महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करा, युवक काँग्रेसची मागणी, सत्यजित तांबेंनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी (दि. 30 जुलै) मुंबईतीली राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

yout congress meets governer
yout congress meets governer

By

Published : Jul 30, 2020, 6:05 PM IST

मुंबई -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी (दि. 30 जुलै) मुंबईतीली राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यासाठी साकडे घालत व इतर महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

ऑनलाईन, मिश्र पद्धतीची परीक्षा किंवा ओपन बुक परीक्षा देण्याचा पर्याय गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शक्य नाही. पुस्तक बघून परिक्षा देण्याचा पर्यायही व्यवहार्य नाही. कारण, बहुतांश विद्यार्थ्यांकडे संदर्भग्रंथ,पाठ्यपुस्तके किंवा नोट्स नाहीत. या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करत बहुतांश राज्यांनी परीक्षा प्रक्रिया राबवण्यास असमर्थता दर्शवली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने आपला निर्णय लादणे म्हणजे घटनेने आखून दिलेल्या संघराज्यीय चौकटीचा अवमान करण्यासारखे आहे, असे मत सत्यजीत तांबे यांनी यावेळी मांडले.

मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ आयोगाने परीक्षांबाबत काहीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गाच्या हितार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, मागील सत्रातील मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे अंतिम सत्राचे गुणांकन करावे. हे करताना देशभरातील सर्व विद्यापीठांनी युजीसीने ठरवून दिलेली समान प्रक्रिया राबवावी जेणेकरुन पुढचा गोंधळ होणार नाही.

बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा विद्यार्थ्यांकडून घेतली असल्याने ती फी विद्यार्थ्यांना परत केली जावी. महाविद्यालये परत कधी खुलणार याबाबत अनिश्चिती असल्याने नवीन सत्राची फी घेऊ नये. टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणी वाढल्याने पुढील सत्राची फी भरण्यापासून दिलासा, द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा तांबे यांनी दिला.यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, भारतीय युवक काँग्रेसच्या सहसचिव रिषिका राका, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस करीना झेविअर आणि विश्वजित हप्पे यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासोबत गेले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details