मुंबई - माढा लोकसभेसाठी भाजपकडून जो कोणी उमेदवार असेल त्याला आमच्या मोहिते घराण्याचा पाठिंबा असेल, असे वक्तव्य रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये मोकळेपणाने काम करता येईल असेही त्या म्हणाल्या. तसेच विजयसिंह मोहिते पाटील हे मनाने आमच्याबरोबर असल्याचेही त्या म्हणाल्या.
रणजितसिंह भाजपमध्ये मोकळेपणाने काम करतील - सत्यप्रभादेवी मोहिते पाटील - loksabha
माढा लोकसभेसाठी भाजपकडून जो कोणी उमेदवार असेल त्याला आमच्या मोहिते घराण्याचा पाठिंबा असेल, असे वक्तव्य रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते पाटील यांनी केले.
सत्यप्रभादेवी मोहिते पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी आज हातावरचे घड्याळ खाली ठेवत भाजपचे कमळ हाती घेतले. मंगळवारी मोहिते पाटील यांनी मोठे अकलुजमध्ये शक्तीप्रदर्शन केले होते.