महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळा प्रकरण: सारंग वाधवा व राकेश वाधवा यांना अटक - police

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवा आणि सारंग वाधवा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

राकेश आणि सारंग वाधवा

By

Published : Oct 3, 2019, 8:32 PM IST

Updated : Oct 3, 2019, 8:49 PM IST

मुंबई - तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने लादलेल्या निर्बंधांनंतर या प्रकरणी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोघांना अटक केली आहे.

बोलताना किरीट सोमैया


याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल आहे. पंजाब महाराष्ट्र बँकेला ज्या 44 मोठ्या कर्जदार खात्यांनी चुना लावला आहे, त्यात 10 कर्ज खाती ही एचडीआयल या कंपनीशी संबंधित आहेत. सारंग वाधवा व राकेश वाधवा या दोन्ही व्यक्तीचा एचडीआयएल या कंपनीशी संबंध आहे. पंजाब महाराष्ट्र बँकेत या दोघांचीही वैयक्तिक खाती असल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे.

हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही


रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रशासक यांच्या आदेशावरून तक्रारदार जसबीरसिंग मठ्ठा यांच्या तक्रारीवरून पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस , चेअरमन वारीयम सिंग व बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा मालक राकेश वाधवा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत पीएमसी बँकेकडून एचडीआयलच्या ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती बुडीत झाल्याने यामध्ये कर्जफेड होत होत नव्हती. ही बाब आरबीआयच्या निदर्शनास न आणता जाणीवपूर्वक ही माहिती लपवत बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून तो आरबीआयला सादर केले असल्याचे पोलीस तपासात आढळून आलेले आहे. या सर्व प्रकारामुळे बँकेला तब्बल 4 हजार 355 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आढळून आलेले आहे. या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार झालेला असून मोठ्या कर्ज प्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली एचडीएल कंपनीचा मालक व बँकेचे पदाधिकारी यांच्यात संगनमत होऊन हा घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेल आहे. याला अनुसरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कलम 409 , 420, 465, 466, 471 सह 120 ब नुसार गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून एका विशेष पथकाची चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा - ठाकरे कुटुंबाने मराठी माणसाला काय दिले - अॅड. सुरेश माने

Last Updated : Oct 3, 2019, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details