महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती; तर मेहता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. अजय मेहता यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हाच अजय मेहता यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

mantralaya
मंत्रालय

By

Published : Jun 24, 2020, 10:42 PM IST

Updated : Jun 24, 2020, 10:57 PM IST

मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर संजय कुमार सूत्रे स्वीकारतील.

संजीव कुमार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी

सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव आहेत. गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. अजय मेहता यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हाच अजय मेहता यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाने त्यांना मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे समजते.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत आहेत. यानंतर 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता आहे. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे.

अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील.

Last Updated : Jun 24, 2020, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details