महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjiv Sane Death : स्वराज इंडियाचे नेते संस्थापक संजीव साने यांचे निधन - Sanjeev Sane leader

स्वराज इंडियाचे ज्येष्ठ नेते संजीव साने ( Sanjeev Sane leader and founder of Swaraj India ) यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन. आज सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते राष्ट्रसेवा दलाचे सैनिक होते.

Sanjiv Sane Death
Sanjiv Sane Death

By

Published : Oct 28, 2022, 11:31 AM IST

मुंबई :राष्ट्रसेवा दल या साने गुरुजींनी सुरू केलेल्या संघटनेत संजीव साने ( Sanjeev Sane leader and founder of Swaraj India ) यांनी योगदान दिले. त्यांनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये संघटनांमध्ये योगदान देत समाजासाठी भरीव कार्य केलेले आहे. गेल्या दोन वर्षापासून ते आजारी होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांना कर्करोग झाला होता. या आजारानेच त्यांचं आज सकाळी निधन झाले.



संजीव साने यांची कारर्कीद :शालेय वयात राष्ट्रसेवा दल या संघटनेमध्ये त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर समाजवादी चळवळीमध्ये युवकांच्या सोबत आंदोलनात हिरिरीने पुढाकार घेतला. समाजातील वंचित, आदिवासी दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी काम केले. पुढे त्यांनी समता आंदोलन संघटनाचे देखील नेतृत्व केलं. मुंबई ठाणे परिसरात समाजातील युवकांना एकत्रित करत समता आंदोलनातून समाजाचे प्रश्न अजेंड्यावर आणले. त्यांचे आई-वडीलच कामगार संघटनांमध्ये सक्रिय होते समाजवादी चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळे आई-वडिलांचा वारसा त्यांनी पुढे चालवला.



शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आणि देशात योगदान : त्यानंतर त्यांनी सोशॅलिस्ट स्वराज इंडिया आम आदमी पक्ष अशा विविध संघटनांमध्ये काम केले. आम आदमी पक्षांमध्ये त्यांना मोठ्या मोठी माता मिळालेली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे मतदाता जागरण अभियान हे नागरिकांचं संघटन ठाणे शहरांमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न केला, त्या अभियान आजही सुरू आहे. तसेच स्वराज इंडिया देशभर सुरू असलेले हे राजकीय पक्षाचे ते देखील एक संस्थापक आहेत. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण अशा अनेक लोकांसोबत त्यांनी स्वराज इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रात आणि देशात योगदान दिले. दोन-तीन वर्षापासून ते सातत्याने आजारी होते. अखेरच्या काही दिवसात त्यांना कर्करोगाने पछाडलं होत. आज सकाळी ठाणे येथे त्यांचा निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी प्रा.नीता साने आणि निमिष साने मुलगा असा परिवार आहे. पत्नी देखील सामाजिक राजकीय चळवळीत सहभागी होत असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details