महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Medha Somaiya defamation case: संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या, मेधा सोमय्यांच्या बदनामी प्रकरणाची आता नियमित सुनावणी

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा याचिके दाखल केली (case filed by Medha Somaiya against Sanjay Raut) होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली आहे. याचिकेवर 1 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी करण्यात येणार असल्याचे आज शिवडी न्यायालयाचे न्यायाधीशांनी सांगितले (Shivdi court orders regular hearing) आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत

By

Published : Sep 29, 2022, 4:55 PM IST

मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा याचिके दाखल केली (case filed by Medha Somaiya against Sanjay Raut) होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली आहे. याचिकेवर 1 नोव्हेंबर पासून नियमित सुनावणी करण्यात येणार असल्याचंं आज शिवडी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले (Shivdi court orders regular hearing) आहे.

संजय राऊत यांच्यामागे यापूर्वीच ईडीने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.



राऊतांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांना दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे हजर राहता आले नाही. आता ईडीच्या कोठडीत असल्याने हजर राहू शकत (Medha Somaiya against Sanjay Raut) नाहीत.



शिवसेना नेते संजय राऊत यांना मागील सुनावणी दरम्यान, कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी मेघ्या सोमय्या यांच्यावरील सर्व आरोप योग्य असल्याचे म्हटले होते, आता या प्रकरणात नवीन काय खुलासा होतो हे महत्त्वाचं असणार आहे.



काय आहे प्रकरण -मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त 15 व 16 एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला, असे डॉ. मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही डॉ. मेधा सोमय्या यांनी केला (Shivdi court order) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details