मुंबई:शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यावर संजय राऊत यांच्या वकिलाकडून युक्तिवाद करणे सुरू आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयात (bombay session court) संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर (sanjay raut bail case) पुढील सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत: गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने संजय राऊत यांना ऑगस्ट महिन्यात अटक केली होती. सध्या संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. आज ईडीच्या वतीने वकील अनिल सिंग यांनी असा युक्तिवाद केला की, दबाव टाकून जमा केलेला काळा पैसा हा मनी लॉन्ड्रीग कायद्यानुसार गुन्हा आहे. संजय राऊत या प्रकरणात सहभागी आहेत. या संदर्भातील अनेक पुरावे तपासा दरम्यान तपास यंत्रणेला मिळाले आहेत.
राऊतांच्या प्रतिज्ञापत्रवर आक्षेप: संजय राऊत यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दिलेले प्रतिज्ञापत्रवर ईडीच्या वतीने आक्षेप नोंदवण्यात आला आहे. आज सुनावणी दरम्यान वकील अनिल सिंग यांनी असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे देण्यात प्रतिज्ञापत्र मध्ये आलेली रक्कम कुठून आली आहे या संदर्भात कुठलेही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पैशाचा स्त्रोत हा संशयास्पद आहे. संजय राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये जमा झाले होते, असे देखील ईडीने म्हटले आहे. मात्र ते कुठून आले या संदर्भातील कुठलीही माहिती राऊत यांनी दिलेली नाही आहे.
पोलिसांची न्यायाधीशांकडे तक्रार:शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत सोनवणे दरम्यान न्यायालय परिसरामध्ये आले असता पत्रकार आणि इतर राजकीय नेते त्यांची मोठ्या प्रमाणात भेट घेत असतात. यादरम्यान संजय राऊत पत्रकारांना राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देखील देत असतात, अशी तक्रार पोलिसांनी न्यायाधीशांकडे केली आहे. यानंतर न्यायाधीशांनी असे म्हटले की, हे प्रकरण राजकीय नाही त्यामुळे राऊत यांच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणावर कुठलाही परिणाम होत नाही. तसेच जर तुम्हाला या संदर्भात काही हरकत असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या. त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल असे देखील न्यायमूर्ती एम जी देशपांडे यांनी म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या वतीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ऑगस्ट महिन्यात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत न्यायालयीन कोठडीत आहे. संजय राऊत यांच्यावतीने 27 सप्टेंबर रोजी जामीन अर्जावर युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावतीने वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, ईडीकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे संजय राऊत यांच्या विरोधात नाही आहे. याप्रकारे अनेक आरोप देखील युक्तिवादा दरम्यान लावण्यात आले होते.
काय आहे पत्राचाळ प्रकरण? -पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्राचाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता, पण 14 वर्षांनंतरही हा करार कागदावरच राहिला. पत्राचाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. तिघांमध्ये झालेल्या करारानुसार जीएपीसीएल चाळीच्या 672 भाडेकरूंना नवीन घर देईल, तसंच म्हाडासाठी घरं बांधेल आणि उरलेली जागा खासगी विकासकाला विकेल. पण इडीच्या दाव्यानुसार संजय राऊत यांच्या जवळचे असणाऱ्या प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी 672 भाडेकरूंपैकी एकासाठीही घर उभारलं नाही. उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने द मिडोस या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली.
ईडी प्रकरण काय आहे? -ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले, हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत, ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितलं. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले.वर्षा यांनी ही रक्कम दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला, असा दावा इडीने केला आहे. इडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले. 'याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले. यातल्या स्वप्ना पाटकर या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत.