महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut Bail: संजय राऊत जेलमध्ये गेले, पण गद्दारीचा शिक्का माथी मारून घेतला नाही- सुनील राऊत - Shiv Sena MLA Sunil

Sanjay Raut Bail: शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय राऊत यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले आहे. मात्र गद्दारीचा शिक्का माथी मारून घेतला नाही, असा टोला शिवसेना आमदार सुनील राऊत Shiv Sena MLA Sunil यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेनेमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

Sanjay Raut Bail
Sanjay Raut Bail

By

Published : Nov 9, 2022, 7:16 PM IST

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय राऊत यांनी जेलमध्ये जाणे पसंत केले आहे. मात्र गद्दारीचा शिक्का माथी मारून घेतला नाही, असा टोला शिवसेना आमदार सुनील राऊत Shiv Sena MLA Sunil यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच राऊतांच्या सुटकेमुळे शिवसेनेमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.

न्यायालयाने जामीन मंजूर केलाकथित पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केलेल्या संजय राऊत यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 3 महिने संजय राऊत आणि लढाई दिली जेलमध्ये गेले. परंतु कोणासमोर गुडघे टेकले नाहीत. त्यांनी जेलमध्ये जाणं पत्करले. मात्र गद्दारीचा शिक्का माती मारून घेतला आहे. आज 3 महिन्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत यांच्या जामीनामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसैनिकांसह राऊत कुटुंब प्रचंड खुश आहेत. लवकरच ते प्रसार माध्यमांसमोर येतील, असे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.

आईला भेटण्यासाठी जाणार खासदार संजय राऊत यांची सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जातील. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन घरी संजय राऊत यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या 84 वर्षीय आईला भेटण्यासाठी जाणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान संजय राऊत यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होतील असे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details