महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 10, 2022, 11:00 AM IST

ETV Bharat / state

Sanjay Raut : सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर संजय राऊत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच संजय राऊत आज संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती ( Sanjay Raut will meet Sharad Pawar ) मिळत आहे. सर्वात प्रथम संजय राऊत यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती तळावर जाऊन अभिवादन केलं होतं.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई : 103 दिवसानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर ( Sanjay Raut granted bail ) केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच संजय राऊत यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला आहे. यासोबतच आज संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याची माहिती ( Sanjay Raut will meet Sharad Pawar ) मिळत आहे.

दुपारी बाराच्या दरम्यान भेट :आज दुपारी बाराच्या दरम्यान संजय राऊत हे मातोश्रीवर जाऊन आधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार ( Sanjay Raut will meet Uddhav Thackeray ) आहेत. ही भेट झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांची ही भेट घेणार आहेत. संजय राऊत यांना जामीन देताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर बोट ठेवले आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात कारण नसताना दोषी करण्यात आला असल्याचे निरीक्षण जामीन देताना न्यायालयाने नोंदवला आहे. याबाबत संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.

सिद्धिविनायकाचे दर्शन : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात प्रथम संजय राऊत यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन ( Sanjay Raut visit Siddhivinayak ) घेतले. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती तळावर जाऊन अभिवादन केले होते. यानंतर भांडुपचा निवासस्थानी गेल्यानंतर तेथे संजय राऊत यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला हा संवाद साधताना विरोधकांना इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे आपण 103 दिवस तुरुंगात होतो आता 103 आमदार निवडून आणू असं वक्तव्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details