महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाने प्रभू श्रीराम यांना एकाप्रकारे किडनॅप केलं-संजय राऊत - sanjay Raut Rahul Gandhi

sanjay Raut today news अयोध्या राम मंदिर उद्घाटनासाठी देशभरातील नेत्यांना केलेल्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार तथा नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय राम मंदिराचे उद्घाटन हा भाजपचा वैयक्तिक कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचंही त्यांनी स्वागत केलं आहे.

sanjay Raut today news
sanjay Raut today news

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 1:16 PM IST

Updated : Dec 28, 2023, 1:26 PM IST

मुंबईsanjay Raut today news - २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना निमंत्रण दिलं नसल्या प्रकरणी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. अयोध्येत भाजपाचं सरकार असून भाजपाने प्रभू श्रीराम यांना एका प्रकारे किडनॅप केलं आहे, असं मला वाटतं. आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट बघत बसलो नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हाला आमंत्रण देणारे भाजपा कोण आहे? जेव्हा आम्हाला प्रभू श्रीरामचंद्र बोलवतील तेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ. जे लोक याबाबत राजकारण करत आहेत, त्यांचं रामाशी नातं नाही. तसंच त्यांच विचारांशी नातं नाही. हा केवळ चुनावी जुमला आहे. आपणाला आमंत्रण आलंय का? तुम्हाला आमंत्रण आलंय का? याच्याशी आम्हाला काय करायचं आहे? हा भाजपाचा कार्यक्रम आहे.
त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं, नाही बोलवायचं हा त्यांचा विषय आहे. ते राम ल्लासाठी कार्यक्रम करत नाहीत. असं असतं तर त्यांनी संपूर्ण देशाला आमंत्रित केलं असतं. भाजपाचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही रामल्ललाच्या दर्शनाला जाऊ.

हे देशाचे किंवा राष्ट्रीय सोहळे नाहीत-देवाच्या दरबारामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये असं कधीच होत नाही. देशात आमंत्रणाचं राजकारण कधीच झालं नव्हतं. भारतीय संसदेचे उद्घाटन झालं तेव्हा सुद्धा हाच प्रकार झाला. राम मंदिराच्या बाबतीत अयोध्येमध्ये तेच सुरू आहे. हे सर्व सोहळे एका पक्षाचे आहेत. हे देशाचे किंवा राष्ट्रीय सोहळे नाहीत. देशाची संसद, अयोध्या राम मंदिर हे राष्ट्राला समर्पित आहेत. अयोध्येच्या मंदिरामध्ये ज्यांच काहीच योगदान नाही, तेच आता पुढे आहेत. फार मोठे काम करीत असल्याचं भारतीय जनता पक्षाला वाटत असेल ते तर ते चुकीचं आहे. या देशातील संस्कृती आणि परंपरा त्यांना तसं करण्याची अनुमती देत नाही.

एका उद्योगपतीला संपूर्ण देश, जंगल, धारावी झोपडपट्टीसुद्धा सर्वच दिले जात आहे. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. एक दिवस अयोध्येचा सातबारासुद्धा कुठल्यातरी उद्योगपतीला दिला जाईल. प्रत्येक कामात त्यांचा व्यापार व व्यवहार आहे- खासदार संजय राऊत


सत्य वाचवण्याचं काम राहुल गांधी करत आहेत-काँग्रेस नेते राहुल गांधी हे १४ जानेवारीपासून भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा, भारत न्याय यात्रा नावाने सुरू करत आहेत. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाने राम मंदिराचा कार्यक्रम हा निवडणुकीच्या दृष्टीनं केला आहे. या देशातून सत्य व न्याय पूर्णपणे संपला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं भारताला जोडण्याचं काम केलं. लोकांची मन आणि समाज जोडण्याचं काम केलं. आता या देशातील संविधान, न्याय, सत्य वाचवण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत. तशा पद्धतीचा संकल्प घेऊन राहुल गांधी भारत न्याय यात्रा करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. मला नाही वाटत की, ही यात्रा करताना त्यांच्यासमोर कुठल्या निवडणुकीचे लक्ष्य आहे. फक्त एक नेता चालत आहे व लोक त्यांच्यासोबत चालत आहेत, असेही राऊत म्हणाले.



अयोध्येचा सातबारा सुद्धा कुठल्यातरी उद्योगपतीला-देशातील प्रमुख प्रकल्प अदानी यांना देण्याबाबत संजय राऊत यांनी टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, छत्तीसगढचं जंगल नष्ट होत आहे. प्रभू श्रीरामांना वनवास झाल्यानंतर त्यांना जंगलात राहावं लागलं. त्यानंतर पुन्हा ते अयोध्येत आले. निदान जंगल तरी राहू द्या. जे आदिवासी याच्या विरोधात संघर्ष करत आहेत, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकत आहात. याचकरता राहुल गांधी यात्रा करत आहेत.

हेही वाचा-

  1. भाजपाच रणछोडदास, राम मंदिर उद्‌घाटनाचं निमंत्रण नसल्यानं संजय राऊतांचा भाजपाला टोला
  2. राममंदिराच्या नावानं पंतप्रधानांचे 'ते' पोस्टर श्रीरामभक्तांच्या भावना दुखावणारे, संजय राऊत यांची भाजपावर टीका
  3. 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
Last Updated : Dec 28, 2023, 1:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details