महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उदयनराजे भोसलेंप्रकरणी भाजपाचे तोंड बंद आंदोलन' - संजय राऊत लेटेस्ट न्यूज

राज्यसभेतील 'जय शिवाजी, जय भवानी' घोषणेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. उदयनराजेंनी शपथविधीदरम्यान घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनी त्यांना टोकले. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली. आता या प्रकरणात संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. भाजपा या विषयावर का गप्प आहे, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

'उदजनराजेंप्रकरणी भाजपाचे तोंड बंद आंदोलन'
'उदजनराजेंप्रकरणी भाजपाचे तोंड बंद आंदोलन'

By

Published : Jul 23, 2020, 2:02 PM IST

Updated : Jul 23, 2020, 3:49 PM IST

मुंबई- 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? असा सवाल करत भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अद्याप घोषणा झाली नसल्याचाही टोमणा राऊत यांनी लगावला. राऊत यांनी टि्वट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यसभेतील 'जय शिवाजी, जय भवानी' घोषणेवरून चांगलेच राजकारण तापले आहे. उदयनराजेंनी शपथविधीदरम्यान घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनी त्यांना टोकले. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली. आता या प्रकरणात संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. भाजपा या विषयावर का गप्प आहे, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यसभेत खासदारकीची शपथ घेताना उदयनराजे भोसले यांनी 'जय शिवाजी, जय भवानी' अशी घोषणा दिली होती. यानंतर उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनी यावर हरकत घेत, हे सभागृह नसून माझे सदन असल्याचे उदयनराजेंना सांगितले. यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली.

ब्राह्मण महासंघाचाही आक्षेप -

पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना असलेल्या ब्राह्मण महासंघानेही नायडू यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. 'स्वतःच्या राज्याची मर्यादा, संस्कार दाखवत असताना फक्त सदनच नाही तर जगभर लुंगी घालून फिरणारे व्यंकय्या नायडू महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या दैवताच्या घोषणेला विरोध करतात हे अनाकलनीय आहे. जोपर्यंत व्यंकय्या नायडू आणि भाजप या कृतीचे स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होऊ नये, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे.

Last Updated : Jul 23, 2020, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details