महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut : गुजरात उद्योग पळवतोय, तर कर्नाटक गावं पळवतोय, सरकार देवधर्मामध्ये अडकले - संजय राऊत - कर्नाटक गावं पळवतोय

जत तालुका कर्नाटकात विलीन करण्याचा प्रस्ताव ( Proposal to merge Jat Talukas with Karnataka ) कर्नाटक सरकारने मांडल्यानंतर महाराष्ट्रात यावरून बराच गदारोळ माजला आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल ( Attack on Chief Minister Eknath Shinde ) केला आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Nov 24, 2022, 1:13 PM IST

मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकात विलीन करण्याचा प्रस्ताव ( Proposal to merge Jat Talukas with Karnataka ) कर्नाटक सरकारने मांडल्यानंतर महाराष्ट्रात यावरून बराच गदारोळ माजला आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल ( Attack on Chief Minister Eknath Shinde ) केला आहे. सरकारचे प्रमुख देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिष यामध्ये अडकल्यामुळे कर्नाटकातून आणि अन्य राज्यातून महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. कोणी उद्योग पळवतायत, कोणी जमिनी, गावं पळवतायत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबईत आपल्या निवस्थानी ते बोलत होते.


महाराष्ट्र देशाच्या नकाशावरून संपवायचा आहे का ?याप्रसंगी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्याचे उद्योग आणि गावं, तालुके दुसऱ्या राज्यात जात असताना यावर ठाम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उभे राहिले नाहीत. तसेच एकही गाव जाणार नाही असं बोलून चालणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. आम्हाला आणि सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आतापर्यंत कर्नाटकच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याची अशी हिंमत झाली नव्हती. कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि तुम्हीही भाजपा राज्यकर्ते आहेत. मला वाटतंय तुमचं आता संगनमत चाललं आहे की गुजरातने उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावं, तालुके, जिल्हे पळवायची आणि सह्याद्री खतम करायचा, भारताच्या नकाशावरून महाराष्ट्र संपवायचा आहे का? असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.


कुठे गेला स्वाभिमान ?संजय राऊत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ले करायचे आणि आमचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं याचे षडयंत्र रचलं जातेय का ? याची भीती वाटतेय. सरकार दुर्बल असेल महाराष्ट्रात, पण शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. आम्हाला तुरुंगाची आणि रक्त सांडण्याची भिती नाही. महाराष्ट्रासाठी लढणारी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. सरकार गुडघ्यावर बसलं असलं तरीही शिवसेना उभी आहे. चंद्रकांत पाटील कर्नाटकात जातात व तेथील कन्नड राष्ट्रगीत म्हणून येतात, असे सांगत महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने बघाल तर याद राखा. स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेले ४० आमदार आता कुठे गेले आहेत? त्यांचा स्वाभिमान कुठे आहे? कुठे ते शेण खात आहेत असा टोलाही त्यांनी याप्रसंगी बंडखोर आमदारांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details