महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut गुजरात निवडणुकीत मोदींना बाजी लावावी लागते- संजय राऊत - Sanjay Raut on BJP election campaign

गुजरात निवडणुकीत मोदींना बाजी लावावी लागत ( Shiv sena over Gujarat Election ) आहे. पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला ( Sanjay Raut Slammed PM Modi ) वेळ देतात. मोदींना प्रचारात उतरावे लागत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Dec 5, 2022, 10:29 AM IST

Updated : Dec 5, 2022, 11:32 AM IST

मुंबई : गुजरात निवडणुकीत मोदींना बाजी लावावी लागत ( Shiv sena over Gujarat Election ) आहे. पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला ( Sanjay Raut Slammed PM Modi ) वेळ देतात. मोदींना प्रचारात उतरावे लागत आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी मोदींना बाजी लावावी लागत आहे. पण मशीनमध्ये गडबड करून किती दिवस बडबड करणार आहेत. लोकांचाही आता यंत्रणेवरून विश्वास उडाल्याचे विधान राऊत यांनी केले.



पंतप्रधानांना प्रचारासाठी काय यावे लागतेगुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार निशाणा साधला. दोन महिन्यांपासून मी बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. पंतप्रधान आपला पूर्ण वेळ गुजरात प्रचारासाठी देत आहेत. गुजरातमध्ये तीन टर्म भाजपची सत्ता असतानाही पंतप्रधानांना प्रचारासाठी काय यावे लागते, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजी लावावी लागतेराऊत पुढे म्हणाले की, गुजरात तुम्ही बनवला असे म्हणता, तर आजही तुम्हाला प्रचाराला उतरावे लागत आहे. खरे तर कोणत्याही निवडणुका प्रचाराविना तुम्ही जिंकायला हव्यात. पण तशी आजची परिस्थिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनादेखील याची कल्पना आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये ठाण मांडून बसले असून प्रचारासाठी इतका घाम गाळावा लागला आहे. निवडणुकीचे निकाल काय लागतील माहित नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजी लावावी लागत आहे.

Last Updated : Dec 5, 2022, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details