महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अयोध्या आणि शिवसेनेचे नाते राजकीय नाही- संजय राऊत

अयोध्या आणि शिवसेना यांच्यातील जे नाते आहे ते राजकीय नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राम मंदिराच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी शिवेसेनेने प्रयत्न केले ते राजकारण म्हणून नव्हे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Jul 20, 2020, 2:24 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जातात. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते, मुख्यमंत्री झाले तेव्हा गेले होते. अयोध्या आणि शिवसेनेचे जे नाते आहे ते कायम आहे ते काही राजकीय नाते नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा जो रस्ता आहे, तो शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिराच्या कामात येाणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. ते राजकारण म्हणून नाही. श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले आणि ते आमचे नाते कायम आहे.

राम जन्मभूमीतील मंदिराच्या भूमीपूजनाचे निमंत्रण आलेय की नाही, याची चर्चा माध्यमं करतात. पण आताच तारीख निश्चित झालीय. राजकीय सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कसा कार्यक्रम करता येईल यावर न्यास निर्णय घेईल, असे राऊत म्हणाले.

काहीजणांना वाटते मंदिर बांधल्याने कोरोना जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते, त्यावर राऊत म्हणाले की, कोरोनाची लढाई ही पांढर्‍या कपड्यातले डॉक्टर लढत आहेत, तेवढेच आम्ही सांगू शकतो. प्रत्येकाची धर्मावर देवावर श्रद्धा कायम असते. उद्धव ठाकरे सांगतील आणि प्रतंप्रधानांसह सर्वच कबूल करतील की या देशातलेच नाही तर जगातले डॉक्टर, पोलीस, परिचारिका या सगळ्यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत बलिदान दिलेले आहे आणि ही लढाई ते देवाच्या आशीर्वादाने लढतील.

दुधाच्या भाजपच्या आंदोलनाचे काही माहीत नाही त्याबद्दल कृषिमंत्री बोलतील.भाजपला आंदोलन करायचे असेल तर करावे. शेतकऱ्यांचा विषय असल्याने राज्य शासन दखल घेईल, असेही राऊत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details