महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut News: भाजपानं सनी देओलला वाचवलं आणि  महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय दिला-संजय राऊत - संजय राऊत सनी देओल बंगला कर्ज दिलासा

अभिनेता, खासदार सनी देओल यांना थकित कर्ज प्रकरणात 'बँक ऑफ बडोदा'कडून मिळालेला दिलासा आणि नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. मराठी माणसावरील अन्याय होत असल्याच त्यांनी एक प्रकारे सूचित केलयं.

Sanjay Raut News
संजय राऊत सनी देओल नितीन देसाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 10:49 AM IST

Updated : Aug 27, 2023, 12:12 PM IST

मुंबई: सनी देओल यांना कर्ज फेडण्यासाठी बँकेनं लिलावाची नोटीस दिली. त्यांच्या बंगल्याला भाजपाकडून २४ तासांमध्ये वाचवण्यात आलं. मात्र, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना भाजपानं दिलासा दिला नाही, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेता आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नितीन देसाई यांच्या कर्जावर कशामुळे तोडगा काढण्यात आला नाही? असा प्रश्न खासदार राऊत यांनी उपस्थित केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, नितीन देसाई हे दिल्लीत भाजपाच्या नेत्यांना भेटले होते. या नेत्यांची नावं घेत नाही. मात्र, त्यांच्याकडून देसाई यांना दिलासा मिळाला नाही. देसाई यांचा स्टुडिओ वाचविला नाही. दुसरीकडे खासदार सनी देओल यांच्या बंगल्याला २४ तासांमध्ये वाचवण्यातं आलं. देओल हे कर्ज फेडू शकले नाहीत. लिलाव काढल्यानंतर त्यांना वाचवण्यात आले. कारण सनी देओल आगामी निवडणुकीसाठी स्टार प्रचारक आहेत. सनी देओल यांच्याशी आमचे शत्रुत्व नसल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.

४ ते ५ हजार कोटींचं कर्ज बुडवून अनेकांवर कारवाई नाही. भाजपाशी संबंधित लोकांचं कर्ज माफ करण्यात आलं. मात्र, आमच्या महाराष्ट्राच्या देसाई यांना वेगळा न्याय दिला. त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं-खासदार संजय राऊत

प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार-भारतीय जनता पार्टीकडं दुसरा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही. ब्रिटिशांच्या काळात जेवढा भ्रष्टाचार झाला नाही, तेवढा भ्रष्टाचार गेल्या दहा वर्षांत झाला आहे. काल गुजरात मंत्रालयाचं वेगळं प्रकरण बाहेर आलं आहे. भाजपाचे मित्र असलेल्या उद्योगपतींना कसा फायदा मिळवून दिला, हे समोर आलं आहे. अशी प्रकरणं रोज बाहेर येत आहेत. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महागाई, बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्याकडे दंगली घडविण्याचा एकच रामबाण उपाय आहे. दंगली घडवायच्या आणि मोर्चे काढायचे, असे सुरू आहे. परंतु 2024 झाली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही, अशी गॅरंटी 'इंडिया' तर्फे आम्ही देत आहोत, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

विज्ञानावर कुठल्याही धर्माचं अतिक्रमण योग्य नाही-संजय राऊत-चंद्रयानानं तिरंगा फडकविलेल्या जागेला वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं नाव दिलं पाहिजे. पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई या दोन महान लोकांमुळे आपलं यान हे चंद्रावर गेलं. तुम्ही वैज्ञानिकांना विसरता आणि प्रत्येक ठिकाणी हिंदुत्व घेऊन येता. परंतु काही गोष्टी विज्ञानाशी जोडलेल्या असतात, हे वीर सावरकरांचंदेखील म्हणणं आहे. त्यामुळे विज्ञानावर कुठल्याही धर्माचं अतिक्रमण योग्य नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेता राऊत यांनी केली.

अजित पवार यांच्या सभेला महत्त्व नाही-संजय राऊत-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेत आहेत. त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उत्तर सभा घेत आहे. धनजंय मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये आज अजित पवार यांची सभा आहे. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, अजित पवार यांच्या सभेला महत्त्व नाही. या उत्तर सभा म्हणजे स्वत:वर अंतिमसंस्कार व 'उत्तरक्रिया' आहेत.

हेही वाचा-

  1. 'इंडिया' लोगोत देशाच्या स्वातंत्र्याचा, एकतेसह स्वाभिमानाचा रंग असणार - संजय राऊत
  2. Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह? पवारांनी उत्तर द्यावे - संजय राऊत
Last Updated : Aug 27, 2023, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details