महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut : राज्याचे गृहमंत्री काय करतायत? कुठे आहेत पोलीस? संजय राऊतांचा गुन्हेगारीवरुन फडणवीसांना प्रश्न - मुंबई स्थानिक बलात्कार प्रकरण

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना कायदा आणि सुव्यवस्थेवरुन प्रश्न केले आहेत. कृषी खात्यातील भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

By

Published : Jun 16, 2023, 12:42 PM IST

मुंबई :सकाळी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वी धावत्या लोकल ट्रेनमध्ये एक 20 वर्षाच्या तरुणीवर 40 वर्षाच्या करीम शेख नामक एका विकृताने गैरवर्तन केले. यावर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. या घटनेवर अजित पवारांनी टीका केल्यानंतर आता संजय राऊत यांनी आज सकाळी सरकारवर टीका केली आहे.

गृहमंत्री काय करत आहेत : अजित पवारांच्या टीकेचा धागा पकडत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. संजय राऊत यांनीही यावर सहमती दर्शवली आहे. ट्रेनमध्ये मुलीवर अत्याचार होत असतील तर ज्यांच्यावर या सर्वांची जबाबदारी आहे. ते राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. पोलीस कुठे आहेत. पोलीस फक्त 40 गद्दार बेईमान आमदारांच्या संरक्षणासाठी ठेवलेले आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी टीका करताना केला आहे.

जनतेचे रक्षण कोण करेल : मिंधे गटात 100 हून अधिक लोकांनी प्रवेश केला. त्यांच्या रक्षणासाठी साधारण 1 हजार पोलीस रक्षणाला लावले आहेत. त्यांना कोणाची भीती वाटत आहे. या पोलिसांची यादी अजित पवारांनी ही लवकरच जाहीर करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. या यादीची आम्ही वाट पाहत आहोत, आमच्याकडे तेची माहिती आहे. ठाण्यातील एक हजार पोलीस शिंदेचे नातेवाईक आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांच्या रक्षणासाठी असतील जनतेचे आणि महिलांचे रक्षण कोणी करायचे असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

कृषीमंत्र्याच्या कारभावरुन शिंदेंना टोला : कृषी खात्यातील भ्रष्टाचार पाहिल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांची दया येते. बोगस धाडीचे प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे लोक अडकले आहेत. खतांमध्ये कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. यावर गृहमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण मुख्यमंत्री शिंदे काहीच करू शकत नाहीत. मुख्यमंत्री त्यांच्याच मंत्र्यांचेच आणि आमदारांचे मिंधे आहेत, अशी राऊतांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Threat Case : संजय राऊत यांना धमकी देणारा निघाला निकटवर्तीय; मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक, कांजूरमार्ग पोलिसांची कारवाई
  2. Patra Chawal Scam : संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीचे आव्हान, आज उच्च न्यायालयात याचिकेवर होणार सुनावणी
  3. Sanjay Raut News: संजय राऊत यांच्या रडारवर शिंदे गटासह भाजपचे तीन नेते निशाण्यावर, लवकरच ईडीकडे करणार तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details