मुंबई :भारत जोडोत व्यस्त ( Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra ) असुनही राहुल गांधी यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे राहुल यांनी म्हटल्याचे खासदार, शिवसेनेचे नेते ( ठाकरे गट) संजय राऊत यांनी ( Sanjay Raut praised Rahul Gandhi ) माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रतिक्रिया देताना संजय राऊत राहुल गांधींचे कौतुक : राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस ( Sanjay Raut jail in 110 days ) यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. भारत यात्रेत दिसल्याचे सांगत राऊत यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे.
महाविकास आघाडीतील प्रेमाचा झरा :राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कुठेतरी आता महाविकास आघाडीत फूट पडते की काय ? अशा चर्चांना सुरुवात झाली होती. तशा प्रकारचे संकेत देखील शिवसेनेकडून देण्यात आले. मात्र, आता संजय राऊत यांनी राहुल गांधीबद्दल केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील हा प्रेमाचा झरा अद्याप देखील ओला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत जडयात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केल्याने आपली राजकीय मैत्री अद्याप देखील तितकेच घट्ट असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
राजकारणातील ओलावा संपला आहे : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी 100 दिवस इडीच्या अटकेतून संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांची तब्बेत ठीक नसल्याने ते सध्या ते विविध तपासण्या करत आहेत. अशातच संजय राऊत यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन आल्याने राऊत भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधींसोबत माझे काल माझे बोलण झाले. त्यांनी माझी चौकशी केली, माझ्या तब्बेतीबाबत विचारणा केली. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले? कुटुंबियांसोबत उभे राहिले? आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोक आले? आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अश्यावेळी गांधी कुुटंबियांनी ठाकरे आणि पवार कुटुंबीयांनी माझी चौकशी केली. आज राहुल गांधी संपूर्ण देशभर प्रेम वाटत फिरत आहेत. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा राजकारणातील ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी (Sanjay Raut praised Rahul Gandhi in Mumbai) दिली.
जनता माफी मागायला लावेल :नेहमीच वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, वक्तव्याचा विपर्यास केला गेला, हा फडणवीसांचा बचाव केविलवाणा आहे. मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकलो असतो. पण आम्ही तसे केले नाही. जे चूक ते चूकच म्हटले पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल इतर कुणी काही बोलले असते तर तुम्ही थयथयाट केला असता. तुमचे राज्यपाल आहेत, म्हणून तुम्ही गप्प बसलात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावल्याशिवाय राहणार नाही.