मुंबई : Sanjay Raut : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत ( Disha Salian death Case ) आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले ( Devendra Fadnavis orders SIT inquiry ) आहेत. दुसरीकडे, दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की दिशाच्या मृत्यूची आधीच बरीच चौकशी झाली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील या चौकशीनंतर सत्ताधारी नेत्यांची विविध प्रकरण बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले ( Sanjay Raut Allegations On Eknath Shinde ) आहेत. राऊत आपल्या मुंबईतील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
म्हणूनच जुने विषय पुन्हा चर्चेत आणले :यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "इंटरपोलकडे जरी केस दिली तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत? महाराष्ट्र हिताचे सीमाप्रश्नाचे विषय का नाहीत चर्चेला येत? नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते, आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. आमचे मुख्यमंत्री दिशा सालियन आणि अन्य विषयात गुंतून पडलेत. नवे ते विषय काढायचे आणि छत्रपतींच्या अपमानाचा विषय, मुख्यमंत्री १६ भूखंडाचा व्यवहार, फुले आंबेडकरांचा अपमान यावरील लक्ष दुसरीकडे जावं यासाठीच हे जुने विषय पुन्हा उकरून काढले जात आहेत." असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.