महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut over Action भाजपला शिवरायांचा इतिहास का बदलायचा आहे-संजय राऊत यांचा सवाल - Sanjay Raut on governors controversial statement

राज्यपालांवर कारवाई करावी ( Action against Governor ) लागेल. विधानसभेचे अधिवेशन 19 डिसेंबरला सुरू ( Vidhan Sabha session ) होत आहे. त्याआधी आणि नंतर विरोधक काय ( Opposition on governor ) करतात ते थांबा आणि पहा, असे सांगत विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते यांनी दिले आहेत.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Dec 5, 2022, 11:10 AM IST

Updated : Dec 5, 2022, 12:55 PM IST

मुंबई राज्यपालांवर कारवाई करावी ( Action against Governor ) लागेल. विधानसभेचे अधिवेशन 19 डिसेंबरला सुरू ( Vidhan Sabha session ) होत आहे. त्याआधी आणि नंतर विरोधक काय ( Opposition on governor ) करतात ते थांबा आणि पहा, असे सांगत विरोधक आक्रमक होणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते यांनी दिले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshiyari) यांच्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

सरकारचा जोरदार समाचार :महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न चिघळला असताना राज्य सरकारने मवाळ भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून शिंदे फडणवीस सरकारचा जोरदार समाचार घेतला. हे सरकार लाचार असून कर्नाटकचा मुद्द्यावर शेपट्या घातल्या आहेत, अशा तिखट शब्दांत टीकास्त्र सोडले.


शिंदे फडणवीस सरकारमध्ये तेवढी हिंमत नाहीकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जातो आहे. समन्वयातून यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई उद्या बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ऐनवेळी हा दौरा रद्द करण्यात आल्याने संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आव्हान देतो. तरी तुम्ही तोंड बंद करून बसला आहात. हे लोक फक्त लाचार आहेत. यांच्यात कर्नाटकला उत्तर देण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत राऊत यांनी सरकारची खरडपट्टी राऊत यांनी केली. दौरा रद्द केल्यावरून राऊत यांनी, चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे यांच्यात हिंमत असेल तर कर्नाटकच्या सीमेला त्यांनी स्पर्श करून दाखवावा, शेपट्या मागे घालून बसण्यात काहीच अर्थ नसल्याचे खडे बोलही सुनावले.



भाजपला शिवरायांचा बदलायचाय इतिहासछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने राज्यपाल आणि भाजपकडून सुरू आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, आरे ला कारे करू असा, इशारा दिला. संजय राऊत यांनी यावरूनही आशिष शेलार यांचा शिवसेना स्टाईल समाचार घेतला. राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल, पण शेलार यांना सांगा. आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्किटं न खाता, त्यांना विचारा की कारे शिवरायांचा अपमान करता? का रे तुम्ही छत्रपतींची बदनामी करता? भाजप नेत्यांच्या मनगटात तेवढी हिंमत नाही, असा हल्लाबोल करताना भाजपने शिवनेरीवर फुली मारली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची भाजप खेळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. भाजपला शिवरायांचा इतिहास का बदलायचा आहे, असा सवाल संजय राऊत आणि उपस्थित करत प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांवर टीका केली.

Last Updated : Dec 5, 2022, 12:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details