मुंबई -महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. यात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज समजले जाणारे कोल्हापूर गादीचे वारसदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील मैदानात उतरत राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेध केला आहे. त्यांनी देखील राज्यपालांना न हटवल्यास रस्त्यावर उतरण्याचे जाहीर केले ( Sanjay Raut on Chatrapati Shivaji Maharaj ) आहे. संभाजी राजे छत्रपती यांच्या या आव्हानाला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Sanjay Raut शिवरायांच्या अपमानाविरोधात सर्वांनी एकत्रित यावे-संजय राऊत - Sanjay Raut on Assam Bhavan
खासदार संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रात सर्वच राज्यांना जागा हवी. आसाम भवनाला मुंबईत जागा नाही. खोके सरकारचे आसामचे नाते काय असा सवाल संजय राऊत यांनी केला.
आम्ही कधी पक्षांतर केलं नाहीपुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, खोके सरकारच आणि आसामचं काय नातं निर्माण झालं आहे माहित नाही. आसामचे मुख्यमंत्री यांचा जर आपण इतिहास पाहिलात तर ते देखील पूर्वीचे काँग्रेसचे नंतर भाजपमध्ये गेले आणि मुख्यमंत्री ( Sanjay Raut on Assam Bhavan ) झाले. आपल्या मुख्यमंत्र्यांचे बघितलं तर ते देखील मूळचे शिवसेनेचे आता भाजपकडे गेलेत. दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल. आम्हाला कधी बोलावलं नाही कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही. कामाख्या देवी चाळीस जण जे गेले आहेत त्यांचा न्याय करेल, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
सर्वांनी एकत्र यावे :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वितरणावरून कोल्हापूर गादिचे वारसदार संभाजी राजे छत्रपती यांनी देखील आता आपण मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "संभाजी राजे यांची भावना ही महाराष्ट्राची भावना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात अल्टिमेटम दिला आहे. सर्वांनी एकत्र यावं हीच भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात एकत्र यावं.