महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानी दहशतवाद्यानंतर आता काही राजकीय नेते मुंबईवर हल्ला करतात- संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल - Sanjay Raut On Mumbai Attack

Sanjay Raut On Mumbai Attack : 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला होता. आता मात्र राजकारणी मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मुंबईवर हल्ला करत असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut On Mumbai Attack
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 1:38 PM IST

मुंबई Sanjay Raut On Mumbai Attack :मायानगरी मुंबईवर 26 /11 चा हल्ला हा मुंबईवर नसून, देशावरती झालेला हल्ला आहे. मुंबई विकलांग करण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होतं. मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न तेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले, आता काही राजकीय लोकं करत आहेत. त्यांच्या हातात फार तर बंदुका नसतील किंवा बॉम्ब नसतील. मात्र काहीही करुन त्यांना मुंबई अस्थिर आणि कमजोर करुन मुंबईचं महत्व कमी करायचं आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकावर केला.

संजय राऊतांनी केलं हुतात्म्यांना अभिवादन :खासदार संजय राऊत यांनी यावेळी त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्यावरील हुतात्मा झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस आहे. अजून देखील जवान बलिदान देत आहेत. मणिपूरमध्ये अजूनदेखील हल्ले सुरू आहेत. जम्मूमध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. परंतु यावर केंद्र सरकार शांत आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.

संविधान वाचवण्यासाठी आपली लढाई : यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला संविधान मिळालं. गेल्या दहा वर्षांपासून या संविधानाचं खासगीकरण सुरू आहे, हे सत्य आहे. संविधान कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. संविधान कुरतडण्याचा प्रयत्न आहे. संविधानात बदल करण्याचं काम तसेच खासगी संविधान लादण्याचं काम या देशात सुरू आहे. संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशाच्या प्रत्येक नागरिकांवरती आहे. ले.

2024 साली या देशाची राजकीय लढाई संविधान वाचवण्यासाठीच होईल. संविधान नसेल तर हा देश राहणार नाह", असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. देशाच्या संविधानावरती हल्ले सुरु आहेत, ते आपण परतून लावले पाहिजेत-खासदार संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू चालणार नाही : चार राज्यातील निवडणुकात मोदींची जादू चालणार नाही, असं राऊत म्हणाले. मिझोरममध्ये भारतीय जनता पक्ष जिंकणार नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ठिकाणीदेखील पंतप्रधान मोदींची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाचा दारून पराभव होणार आहे. राजस्थान या ठिकाणी अशोक गेहलोत हे जादूगार आहेत. भाजपा विकासाच्या कामावरती मते का मागत नाही? तुम्ही रामलल्ला मोफत दर्शन हे आमीष दाखवण्यापेक्षा काश्मीरमध्ये कश्मीर पंडित यांची घरवापसी दाखवली असती, तर मग तुम्हाला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मतं मागण्याचा हक्क होता. रामलल्लाचं दर्शन हे आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगानं ताबडतोब भाजपाला नोटीस बजावली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरती मतं मागितली, म्हणून त्यांचा मतदानाचा हक्कं हिरावून घेतला होता. मग निवडणूक आयोग भाजपावरती कारवाई का करत नाही? आमच्या पाच आमदारावर कारवाई झाली होती. राहुल गांधी यांच्यावरदेखील कारवाई झाली होती. मग बाकीच्यांना न्याय वेगळा आणि भाजपाला न्याय वेगळा?" असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

  • 48 पैकी ते 148 जागांवरही दावा करतील : यावेळी पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले की, "लोकसभेत जास्तीत जास्त जागा महायुती जिंकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 48 पैकी ते 148 जागांवरदेखील जिकण्याचा दावा करतील. त्यांचं सर्व कार्य हे सर्वांना माहित आहे", अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

हेही वाचा :

  1. संजय राऊतांच्या 'त्या' ट्विटवर इस्रायलचा आक्षेप; राऊत म्हणाले यामागे नक्कीच राजकारण
  2. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट लावलं तर लोक जोड्यानं मारतील; 'त्या' बॅनरवरुन संजय राऊतांचं शिंदेंवर टिकास्त्र
  3. संजय राऊत यांची विकृत मानसिकता झळकली; ‘त्या’ फोटोवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details