महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हणून... महाराष्ट्रात कोरोना रुग्णात वाढ; संजय राऊतांनी सांगितलं कारण - संजय राऊत लेटेस्ट न्यूज

मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात कोरोनाची लढाई लढली जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होते.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Apr 13, 2021, 4:27 PM IST

मुंबई -देशात कोरोनाचीची परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. हरिद्वारमध्ये महाकुंभमेळ्यात १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच वाढणाऱ्या कोरोना संख्येवर ही त्यांनी भाष्य केले आहे. इतर राज्यांमधून लोक येत असतात. तिथे नियंत्रण नाही हे विचार करण्याची गोष्ट आहे,” असंही ते म्हणाले आहेत.


महाराष्ट्र सरकार आरोग्यव्यवस्थेत देशातील सर्वोत्तम आहे.
मुख्यंत्र्यांच्या नेतृत्वात कोरोनाची लढाई लढली जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी संपूर्ण देशाचा विचार करायला हवा. हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. त्यावर नियंत्रण ठेवायला हवं होते. राज्यात गुढीपाडवा साजरा करण्यावर मुख्यमत्र्यांनी नियंत्रण आणलं. लोकांना आवडत नसले तरी पण सरकारने केले आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून लोक येत असून तिथे नियंत्रण नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात सगळ्या गोष्टींवर नियंत्रण
“मला जे काही चित्र दिसत आहे त्यानुसार महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभर असा निर्णय लावला गेला तरी आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आहे. कायदा आणि नियमांचं पालन होत आहे,” असे संजय राऊत यांनी सांगितलं.

बंगालमध्ये हे शिखंडी कोण
“पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं युद्ध सुरु आहे ते नवं महाभारत आहे. जसं त्या महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाही. अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळलं किंवा लढलं जात आहे. असेही राऊत म्हणाले.

त्या तारखेसाठी शुभेच्छा
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य केलं होते. जर महाविकास आघाडीचे सरकार त्यांना पाडायचे असेल आणि त्यासाठी नवीन तारीख डिक्लेअर केली असेल तर त्यात तारखेसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत. असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details