मुंबई -विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना कोरोनाची ( Corana ) लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तसेच संपर्कात असलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी असा आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळतात शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला ट्विटरद्वारे ( Twitter ) दिला. "काळजी घ्या, आपल्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो" जय महाराष्ट्र ! असं ट्विट संजय राऊत यांनी केल आहे.
sanjayraut on fadanvis : फडणवीसांना कोरोना झाल्याचे समजताच राऊतांकडून काळजी घेण्याचा सल्ला - संजय राऊत
विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना कोरोनाची ( Corana ) लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळतात शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजी घेण्याचा सल्ला ट्विटरद्वारे ( Twitter ) दिला.
संयज राऊत
दरेंकरांकडूनही काळजी घेण्याचा सल्ला - ज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. "आपण काळजी घ्या, कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचे प्रेम आणि सदिच्छा आपल्या पाठीशी आहे. आपण लवकर बरे होऊन पुन्हा समाजसेवेच्या कार्यात रुजू व्हाल असा विश्वास आम्हाला आहे" असे ट्विट प्रवीण दरेकर ( Pravin Darekar) यांच्या कडून करण्यात आले आहे.