मुंबई - Sanjay Raut on CM Eknath Shinde : मुंबईत विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीची आजपासून बैठक सुरू होत आहे. 31 ऑगस्ट आणि 01 सप्टेंबर रोजी मुंबईतील 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचं यजमानपद ठाकरे गटाच्या शिवसेनेकडं आहे. या बैठकीच्या आयोजनाची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे आहे. त्यामुळं राऊत हे बुधवारी रात्रीपासूनट 'हॉटेल ग्रँड हयात' मध्ये तळ ठोकून आहेत. बैठकीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आघाडीतील महत्त्वाचे सर्व नेते आज संध्याकाळपर्यंत मुंबईत दाखल होतील, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut on INDIA Alliance Meeting) (Sanjay Raut Criticized CM) (Sanjay Raut on Mahayuti Meeting)
सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार - आज आणि उद्याच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाबद्दल मी आता काहीही तुम्हाला सांगू शकत नाही. या बैठकीनंतर आमची जी काही संयुक्त पत्रकार परिषद होईल, त्याचवेळी तुम्हाला याबाबतची माहिती मिळेल. आमची 'इंडिया' आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटेल हे नक्की, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली.