मुंबई - आगामी विधानसभेसाठी राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा हा भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या फाळणीपेक्षाही कठिण असल्याचे, शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच जागावाटपाचा निर्णय झाल्यावर योग्यवेळी तो जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अनेक दिवसांपासून युतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत - संजय राऊत शिवसेना
आगामी विधानसभेसाठी राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाचा तिढा हा भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या फाळणीपेक्षाही कठिण असल्याचे, शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच जागावाटपाचा निर्णय झाल्यावर योग्यवेळी तो जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत
हेही वाचा -घाटकोपर पश्चिम मतदारसंघ : राम कदम साधणार का विजयाची हॅट्रिक?
महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य आहे. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांच्या वाटपाचा भारत-पाकिस्तानच्या फाळणीपेक्षाही कठिण असल्याचे, विधान त्यांनी केले. एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना त्यांनी हे विधान केले. तसेच आम्ही जर आधी विरोधी पक्षात असतो तर आजही परिस्थिती वेगळी असती, असेही त्यांनी म्हटले आहे.
Last Updated : Sep 24, 2019, 1:05 PM IST