मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर ( Maharashtra Karnataka Boundary Question ) आज केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांचे बैठक (Meeting of Chief Ministers of the State ) होत आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असले तरी केंद्रीय गृहमंत्र्यांना त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते मध्यस्थी करून सीमा प्रश्न निकाली काढत असतील तर त्यावर टीका काय करायची, अशी भूमिका संजय राऊत ( Role played by Sanjay Raut ) यांनी मांडली.
अल्पसंख्यांकनुसार निर्णय घेण्याचे अधिकार :महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संदर्भात पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी मध्यस्थी करावी लागेल. दोन्ही राज्यांत भाजप सरकार आहे. महाराष्ट्रात ही भाजपचे राज्य आहे. परंतु, अमित शहांना भेटून काही फायदा नाही, असे म्हणतात. ते केंद्रीय गृहमंत्री आहेत. हा संपूर्ण भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार गृहमंत्र्यांना आहे. त्या सीमा भागातील कारवार, निपाणीसह 56 गावात कर्नाटकचे पोलीस धुडगूस घालत आहे. राज्य पोलीस दलाचा फौज फाटा मागे काढून सैन्य दलाचे फोर्स पाठवत आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी हे पोलीस केंद्रीय गृहमंत्रीच पाठवू शकतात. तेथील भाषे संदर्भात एक आयोग आहेत. त्यांना अल्पसंख्यांकनुसार निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती या संदर्भात अधिकार वाणीने आदेश देण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री यावर मध्यस्थी करणार असतील तर त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही, असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : प्रश्न निकाली निघणार असेल तर टीका का करायची - संजय राऊत - Why criticize if question is going to be settled
आज केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बैठक (Meeting of Chief Ministers of the State ) होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संदर्भात पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांनी मध्यस्थी करावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री यावर मध्यस्थी करणार असतील तर त्यावर टीका करण्याचे काही कारण नाही, असे राऊत म्हणाले.
गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे जावई :आमच्या गृहमंत्र्यांना आव्हान आहे. गेल्या 70 वर्षांपासून त्या भागातील मराठी माणसावर होणार अन्याय होतोय. चिरडले जात आहे, भरडले जात आहे. त्यासंदर्भात तुम्ही निर्णय घ्यावा, असा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला. गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत. सीमा प्रश्नाचे जास्त चटके कोल्हापूरला बसत आहेत. त्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे असे राऊत यांनी सांगितले. तसेच अनेक प्रकरण न्याय प्रविष्ट आहेत. म्हणून केंद्राने त्यावर बोलायचे नाही का.? संसदेत प्रश्न विचारायचे नाहीत का? आज न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतो. कारण तो राजकीय प्रश्न आहे. पण 20 आणि 25 लाख मराठी माणसांचा प्रश्नांसाठी तारीख पे तारीख सुरू आहे. आता गृहमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना घेऊन हा प्रश्न निकाली काढणार असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील इतर राज्यांवर दावा: सीमा प्रश्न चिघळला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईसह महाराष्ट्रातील इतर राज्यांवर दावा सांगायला लागले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाहीत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबत जाब विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल असे राऊत यांनी सांगितले. पोलिसांच्या बदल्या, प्रबोधनकार ठाकरे चौकाची केलेल्या तोडफोडवर ही त्यांनी भाष्य केले.
मोदींवर जोरदार टीकास्त्र :चीनची लोक तवांग मध्ये घुसलेले आहेत. त्यांना आपण परत पाठवले. वारंवार चीन कधी लडाख मधून अरुणाचल प्रदेश घुसण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सारखे नेहमीप्रमाणे त्यांच्या खापर पंडित नेहरू फोडत आहोत. हे कितपत योग्य आहे. सीमा प्रश्न हे त्या त्या वेळेला त्या त्या सरकार असते. गेल्या 70 वर्षात एवढी घुसखोरी झाली नाही, तेवढी आता आहे. ही चांगली गोष्ट नाही. आपली सगळ्यांची कर्तव्य आहे की, आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा आपण काय करू शकते, हे पाहायला हवे, असे राऊत यांनी सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.