मुंबईSanjay Raut News: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी बुधवारी भोपाळ येथून फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळं अद्वय हिरे यांच्या अटकेनंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत.
काय म्हणाले खासदार संजय राऊत : अद्वय हिरे यांच्या अटकेबाबत मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, राजकीय दबावतंत्रानं हिरे यांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. पण खरं म्हणजे हे आरोप त्यांच्यावर भाजपमध्ये असतानाही होते. मालेगाव विधानसभेत त्यांनी सभा घेतली. त्यामुळं मंत्री महोदय दादा भुसे यांनी त्यांच्या कुटूंबियांविरोधात 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर निव्वळ दबाव आणण्यासाठी ही अटक करण्यात आलीय, असं म्हणत राऊतांनी हिरेंच्या अटकेवरून हल्लाबोल केलाय.
2024 ला पोलिसांचा हिशोब केला जाईल : पुढं बोलताना राऊत म्हणाले की, "दादा भूसे यांच्यावरही गिरणा सहकारी साखर कारखान्यात घेटाळा केल्याचा आरोप आहे. आम्ही रितसर तक्रार केलीय. राहूल कूल यांच्यावर काय कारवाई झाली? भिमा पाटस सहाकरी कारखान्यात मनी लाॅंड्रींग आहे. 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. हे आरोप स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तेच अजित पवार आज गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हसन मुश्रीफ यांनी संताजी घेरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला. ते बाहेर सुटले.