मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस भारतात घेऊन आले, असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सामनामधील त्यांच्या 'रोखठोक' या सदरात केला आहे. केंद्राचे अपयश स्पष्ट दिसत असताना राज्यांना दोष का? असा सवाल करत राऊत यांनी गुजरातमध्ये जो करोना विषाणू पसरला आहे. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने लाखोंचा जलसा अहमदाबाद येथे झाला त्यातून कोरोना पसरला आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
भारतात डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच कोरोना वाढला, संजय राऊत यांचा मोदींवर घणाघात - US President Donald Trump
अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही, असे राऊत यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना वाढला. अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक आहे. कोरोनाचे संकट हाच राष्ट्रपती राजवटीचा निकष ठरवला तर उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशसह किमान 17 राज्यांत सगळ्यात आधी राजवट लावावी लागेल. तसेच केंद्राचे सरकारही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.