महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay raut : इथले प्रकल्प गुजरातला नेले त्यामुळे सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात - खासदार संजय राऊत - criticized on shinde fadanvis government

बेरोजगारीच्या दरात वाढ हे प्रामुख्याने शहरी भागातील बेरोजगारी वाढल्यामुळे आहे. (sanjay raut criticized on shinde fadanvis government ) यावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ( employment generating projects were taken to Gujarat ) वेदांता सारखे व इतर उद्योग हे गुजरात निवडणुकीच्या निम्मितान तिथे पळवले. त्यामुळे बेरोजगारीचा फटका सर्वात जास्त महाराष्ट्राला बसला आहे. (outgoing projects from Maharashtra to Gujarat)

Sanjay raut
खासदार संजय राऊत

By

Published : Jan 3, 2023, 2:31 PM IST

खासदार संजय राऊत

मुंबई : डिसेंबर 2022 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 8.30% इतका वाढला आहे. 16 महिन्यांतील हा उच्चांक आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर ८.३२% होता. डिसेंबर 2021 मध्ये ते 7.91% आणि नोव्हेंबर-22 मध्ये 8% होते. ( sanjay raut criticized )


लाखो रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला :यावर बोलताना खासदार संजय राऊत ( sanjay raut criticized ) म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त बेरोजगारी वाढळी आहे. कारण, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प हे गुजरातला पळवले आहेत. वेदांता असेल, ब्लग ट्रक पार्क असेल, असे लाखोंचा रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला गेले. जे उद्योग एका वेळेला दीड, दोन लाख रोजगार देउ शकत होते. (criticized on shinde fadanvis government )


इतरांना भूगोल महाराष्ट्राला इतिहास :पुढे बोलताना राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज माफीवीर होते का? छत्रपती शिवाजी महाराज हे जुने पुराने इतिहासातील नेते होते? आता त्यांचं महत्त्व नाही हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान आहे. इतर राज्यांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास यासाठी आहे इथे छत्रपती जन्माला आले म्हणून हा आम्हाला इतिहास आहे. भाजपच्या राज्यपालांना हा इतिहास मान्य नाही कां? महाराष्ट्राचा स्वाभिमान हा छत्रपतींपासून सुरू होतो आणि संपतो. भाजपचे नेते मुख्यमंत्री छत्रपती यांच्या अपमान बाबत गप्प बसलेत आणि दुसऱ्या विषयाकडे लोकांचं लक्ष केंद्रित करत आहेत." अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे. (outgoing projects from Maharashtra to Gujarat)


टोळ्या गॅंग वॉरमध्ये मारल्या जातात :मिंदे असतात मांडलिक आहेत. त्यांना स्वताच अस्तित्व नाही. ते समर्पित झाले आहेत. विलीन झाले आहेत. भारतीय जनता पक्षात त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे. स्वाभिमान संपला आहे. त्यांचा जो पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करत आहेत. त्यामुळे त्यांना एकही जागा नाही. या उलट शिवसेना आमची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली शिवसेना महाराष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहील संघर्ष राहील. त्यांचा एक गट आहे. टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं. टोळी ही एकतर गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारली जाते. हा मुंबईतला इतिहास मला माहित आहे. टोळ्या नष्ट होतात टोळ्यांच अस्तित्व राहत नाही. जितक्या दिवस आहेत तितक्या दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि मग परदेशात पळायचे. अशी जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details