महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपाच रणछोडदास, राम मंदिर उद्‌घाटनाचं निमंत्रण नसल्यानं संजय राऊतांचा भाजपाला टोला - राऊतांची भाजपावर टीका

Sanjay Raut Criticized BJP: केंद्र सरकारने राम मंदिर उद्‌घाटनाचे निमंत्रण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले नसल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. आम्ही पळपुटे नाही तर तुम्हीच रणछोडदास असल्याचं म्हणत त्यांनी भाजपाला हिणवले.

Sanjay Raut Criticized BJP
संजय राऊतांची भाजपावर टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 7:39 PM IST

Updated : Dec 27, 2023, 7:47 PM IST

मुंबईSanjay Raut Criticized BJP: अयोध्येत पुढील महिन्यात राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On Ram Mandir) आम्ही पळपुटे नाही तर तुम्हीच रणछोडदास असल्याचं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली.

भाजपाचे कोणत्या लढ्यात योगदान :आधीचा इतिहास असो वा हिंदू वाचवण्याचा मोठा संघर्ष झाला त्यांना माहीत नाही. स्वातंत्र्यलढा असो की संयुक्त महाराष्ट्र लढा, (Sanjay Raut on Babari) या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोकं दिसत नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानामध्ये ते आहेत, हे त्यांनी सांगावं मग लोणची पापड विकत बसावं, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. (BJP is Ranchodas)

भाजपाला आधीचा इतिहास माहीत नाही :स्वतः काही बनवायचं नाही, स्वतः काही करायचं नाही. हे लोक म्हणतात 2014 नंतर भारत निर्माण झाला. यांचा जन्म 2014 नंतर झाला. त्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहीत नसल्याचंही राऊत म्हणाले. देशाचा इतिहास खूप मोठा आहे. इतिहासाशी त्यांना काही घेणं-देणं नाही. त्यांना दुसऱ्याविषयी पोटदुखी असते. या लढ्यात इतिहासाच्या पानावर आमचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं आहे. कोठारी बंधू हे शिवसैनिकच होते. शिवसेनेचे त्यावेळचे खासदार, आमदार मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले, सतीश प्रधान, मनोहर जोशी हे सगळे लोक बाबरी मशीद खटल्यातील आरोपी आहेत. असं नसतं तर मग त्यांना आरोपी का केलं? बाकी हे बिळात लपले असल्याचा टोला राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

बाबरी पाडणारे आकाशातून आले होते का?भाजपा नेत्यांनी शिवसेनेला काल पळपुटे, रणछोडदास म्हटलं होतं. अशांनी आधी भाजपाचा इतिहास पाहिला पाहिजे. शिवसेना तेव्हा कुठे होती? तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांचे स्टेटमेंट काय आहे? त्यावेळेला बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलेलं आहे भाजपानं नाही. अधिकृतपणे भाजपाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांचं स्टेटमेंट आहे. नंतर ते पळून गेले. लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पाहा. ते म्हणाले, आमचं काम नाही. मग बाबरी कोणी पाडली. बाबरी पाडणारे आकाशातून आले होते का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्हीच होतो म्हणणारे शिवसैनिकच होते. बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. पळून नाही गेले बाकीच्यांसारखे! बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे भगोडे नव्हते. तर भाजपाची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


श्रीराम सर्वांपेक्षा मोठे :संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा देखील समाचार घेतला आहे. कोण महाजन? मी फक्त एका महाजनांना ओळखतो. ते म्हणजे प्रमोद महाजन. प्रमोद महाजन यांचं शिवसेना-भाजपासाठी शेवटपर्यंत योगदान होतं. तेच महाजन फक्त आपल्याला माहीत असल्याचं सांगत संजय राऊतांनी गिरीश महाजनांना टोला लगावला. श्रीराम सर्वांपेक्षा मोठे आहेत. रामापेक्षा कोणीही मोठं नाही. जे अयोध्या रणातून पळून गेले, ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला असं वाटतं ते रामापेक्षा कधी मोठे झाले? तुमची पळण्याची आणि लपण्याची ठिकाणं आमच्याकडे असल्याचाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. ब्रिटिशांचे मुखबीर होते, ते आता राज्यकर्ते बनले हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

  1. युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन, जाणून घ्या काय केल्या उपाययोजना
  2. अजित पवारांची निधी वाटपात मनमानी, भाजपा, शिवसेना सदस्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
  3. रस्ताच नाही सांगा कसा साधायचा 'विकास'; मेळघाटातील अतिदुर्गम गावातील आदिवासी महिलांचा टाहो
Last Updated : Dec 27, 2023, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details