मुंबई- भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश दिला आहे. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. जर त्यांना सत्ता स्थापन करायची नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? असा टोला लगावला.
'मी पुन्हा येईन...सत्ताच स्थापन करणार नाही, तर मुख्यमंत्री त्यांचा कसा?'
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. जर त्यांना सत्ता स्थापन करायची नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होईल? असा टोला लगावला आहे.
संजय राऊत
कोणत्याही किमतीवर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री -
तर कोणत्याही किमतीवर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नक्की काय घडते? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.