मुंबई : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर टीका केली विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. तुम्हाला अधिकार दिले मग तुम्ही असे निर्णय कसे घेऊ शकता असाही प्रश्न राऊतांनी विचारला आहे. याचवेळी लोक आमच्यासोबत आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. बोलताना त्यांनी राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली दुसऱ्याच्या लग्नात अब्दुल्ला दिवाना असे म्हटले.
हा राजकीय हिंसाचार : आज जे काही होत आहे, तो राजकीय हिंसाचार आहे असे म्हणत राऊत यांनी जोरदार टिका केली आहे. याचवेळी जे आमच्यातून गेले ते पुन्हा निवडणून येणार नाहीत. कोणतेही नाव आणि कोणतेही चिन्ह घेऊद्या हे लोक तुम्हाला कोणत्याच सभागृहात दिसणार नाहीत, असेही राऊत म्हणाले आहेत.
पश्चिम बंगालसारखी परिस्थिती : मोदी आणि शाहा यांनी पंश्चिम बंगालमध्ये जो काही हैदोस घातला, त्याला जनतेने नाकारले आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी निवडणून आल्या असा दाखला देत राऊत यांनी आम्हालाच पुन्हा बहुमत मिळेल असा दावा त्यांनी यावेळी बोलतना केला आहे.
आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नाही :आता ही लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे नसून ठाकरेंची शिवसेना वुरुद्ध महाशक्ती अशी आहे असे म्हणत राऊत यांनी यावेळी भाजपवरही जोरदार घणाघात केला आहे. तसेच, ज्यांनी या लोकांना वापरून घेतले त्यांच्या जिवावर हे लोक आमच्याशी लढत आहेत असे म्हणत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.