मुंबई - गेल्या ५ वर्षात शिक्षण क्षेत्रात विष पेरण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच पंरपरेने लाभलेला इतिहास बदलून, शालेय विद्यार्थ्यांना बिघडवण्याचा प्रयत्नही झाल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र घडवण्याचे काम शिक्षकी पेशाने केले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राऊत म्हणाले.
मुंबईमध्ये शिक्षक भारती संघटनेच्या अधिवेशनात संजय राऊत बोलत होते. यावेळी राष्ट्रावादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती. मंत्रायलामध्ये शिक्षकांना ताठ मानेने जाता आले पाहिजे असेही राऊत म्हणाले. पवारसाहेंबांनी विनंती आहे की एक दिवस महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या प्रश्नाला द्या. मी कधी मंत्रालयात येत नाही. मात्र,शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी मंत्रालयात येईल, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच जाणता राजा (सरद पवार) शिक्षकांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला