मुंबई -राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्यासाठी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे समीकरण जुळण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली असल्याची बातमी माध्यमांमध्ये फिरत होती. मात्र, संजय राऊत यांनी अशी कुठल्याच प्रकारची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली असल्याची बातमी माध्यमांमध्ये फिरत होती. मात्र, संजय राऊत यांनी अशी कुठल्याच प्रकारची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून काँग्रेसने शिवसेनेला आश्वास्त केले. या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. सत्तास्थापनेसंबधीत अनेक तर्क लावले जात होते. मी उद्धव यांच्यावतीने स्पष्ट करतो की, या प्रकारची कोणतीच बैठक उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्या दरम्यान झाली नसून आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत, असे संजय राऊत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यांनी या आशयाचे टि्वट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये केले आहे.
संजय राऊत यांच्या छातील दुखत असल्याने त्यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी लिलावती रूग्णालयात त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचे निदान झाले होते.