महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut challenged: इडीच्या समन्स नंतर संजय राऊतांचे आव्हान; म्हणाले मला अटक करा - महाष्ट्रात राजकीय भुकंप

इडीने मला समन्स पाठवले आहे. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे. मान कापली तरी मी गुवाहाटी चा मार्ग स्विकारणार नाही असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला अटक करा (said to arrest me) असे आव्हान (Sanjay Raut challenged after ED summons) विरोधकांना दिले आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Jun 27, 2022, 1:55 PM IST

मुंबई:एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाष्ट्रात राजकीय भुकंप ( Maharashtra Poltical Crisis ) झाला आहे. क्षणा क्षणाला घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकीकडे अपात्र ठरवण्याचे प्रयत्न सुरु असताना शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यातच संजय राऊतांना ईडीने नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट केले असुन यात म्हणले आहे की, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र!

ABOUT THE AUTHOR

...view details