मुंबई- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी काही तासच शिल्लक राहिल्याने प्रचाराला वेग आला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपल्या मतदारसंघात बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
संजय निरुपम यांची बाईक रॅली; हेल्मेट घालून दुचाकीवरून केला प्रचार - लोकसभा निवडणूक
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपल्या मतदारसंघात बाईक रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

बाईक रॅलीत संजय निरुपम यांनी दुचाकीवर हेल्मेट घालून नागरिकांना अभिवादन करत गोरेगाव पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग ते जुहू परिसरात प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात मिळणारा प्रतिसाद पाहता आत्मविश्वास अजून वाढला असल्याचे निरुपम यांनी सांगितले.
उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरुपम हे निवडणूकीच्या रिंगणात असून त्यांची लढत शिवसेनेने उमेदवार गजानन किर्तीकर यांच्याबरोबर होत आहे. महत्वाचे म्हणजे गजानन किर्तीकर विद्यमान खासदार आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघातून समाजवादी पार्टीने सैदपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या सुभाष पासी यांना उमेदवारी दिल्याने ही लढत रंगतदार बनली आहे.