मुंबई - उत्तर पश्चिम लोकसभेचे आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या जोगेश्वरी येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आमिषा पटेल हिने केले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमिषा पटेल हिनं केलं संजय निरुपम यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन - election
उत्तर पश्चिम लोकसभेचे आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या जोगेश्वरी येथील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आमिषा पटेल हिने केले.
![आमिषा पटेल हिनं केलं संजय निरुपम यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्धाटन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2973071-thumbnail-3x2-mu.jpg)
लोकसभेच्या निवडणूकीच्या प्रचाराठी संजय निरुपम यांनी जोगेश्वरी येथे मध्यवर्ती कार्यालय उभारले आहे. हे कार्यालक कार्यकर्त्यांना प्रचारासाठी तसेच भेटीसाठी उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन बॉलिवुडची प्रसिध्द अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या हस्ते करण्यात आले.
माझे आजोबा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. आज संजय निरुपम यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. निरुपम यांनी आपल्याला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलावावं, असे अमिषा पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. मी कोणाला मतदान करणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, असेही आमिषा पटेल हिने यावेळी म्हटले.