ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर - संजय लीला भन्साळी चौकशी

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गेल्या काही महिन्यात बरेच चित्रपट साईन केले होते. मात्र, अचानक काही निर्मात्यांशी खटके उडाल्याने त्याच्यासोबत केलेला करार हा मोडण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही जणांची चौकशी करण्यास सुरुवात केली असून यात संजय लीला भन्साळी यांच्यासह कंगना रनौत व शेखर कपूर यांचेही जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

Sanjay Leela Bhansali  sushant singh rajpur suicide  Sanjay Leela Bhansali inquiry  inquiry in sushant singh rajpur suicide  सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण  संजय लीला भन्साळी चौकशी  सुशांतच्या आत्महत्येची चौकशी
संजय लीला भन्साळी
author img

By

Published : Jul 6, 2020, 1:12 PM IST

Updated : Jul 6, 2020, 4:17 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असून याप्रकरणी मृत सुशांतसिंह राजपूत याचे कुटुंबीय, मॅनेजर, घरातील नोकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील काही जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. त्यानंतर पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जबाब नोंदविण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यासाठी भन्साळी हे स्वतः सोमवारी वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर

आतापर्यंत २९ जणांचे जबाब नोंद -
सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू संदर्भात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तब्बल २९ जणांचे जवाब नोंदविले असून यात सुशांतसिंह राजपूत याच्या कुटुंबातील त्याची बहीण, वडील के. के. सिंह, सुशांतसिंह राजपूत याचा जवळचा मित्र महेश शेट्टी, संदिप सिंह, त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा, यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा, यश राज फिल्मचे माजी अधिकारी आशिष सिंग व आशिष शर्मा, अभिनेत्री संजना संघी यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या करण्यापूर्वी त्याने गेल्या काही महिन्यात बरेच चित्रपट साईन केले होते. मात्र, अचानक काही निर्मात्यांशी खटके उडाल्याने त्याच्यासोबत केलेला करार हा मोडण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही जणांची चौकशी करण्यास सुरुवात केली असून यात संजय लीला भन्साळी यांच्यासह कंगना रनौत व शेखर कपूर यांचेही जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. कंगना रनौत हिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सुशांतसिंहची आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला होता. याबरोबरच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुद्धा एका ट्विटच्या माध्यमातून सुशांतसिंह याने त्याच्यासोबत घडत असलेल्या गोष्टींबद्दल मला सांगीतले होते, असे म्हटले होते. या सर्व गोष्टींमुळे सुशांतसिंह हा कोणत्या दबावाखाली होता याचा शोध पोलीस घेत आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांच्या पथकाने सुशांतसिंह राजपूत याच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल देत त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, यशाच्या शिखरावर असलेल्या व कुठलेही आर्थिक संकट नसलेल्या सुशांतने आत्महत्या कुठल्या कारणाने केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jul 6, 2020, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details