महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छतेतून समृध्दीकडे...'या' व्हिडिओमुळे लातुरात स्वच्छता मोहिमेला गती - स्वच्छतेतून समृद्धीकडे

स्वच्छतेमध्ये लातूर महानगपालिकेला यंदाचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तेव्हापासून स्वच्छता विभागाचा उत्साह दुणावला असून या मोहिमेत सातत्य आहे. सकाळच्या प्रहरी स्वच्छतेतून समृद्धीकडे....चला लातूर स्वच्छ करूया... अशा प्रकारचे गाणे वाजवीत जनजागृती केली जाते.

'या' व्हिडिओमुळे लातुरात स्वच्छता मोहिमेला गती

By

Published : Sep 22, 2019, 6:13 PM IST

लातूर- सूर्य उगवताच 'स्वच्छ हे लातूर करूया' हा नाद करत दारात येणारी घंटागाडी आणि कचऱ्याचे होणारे वर्गीकरण हे नित्याचेच आहे. मात्र, गेल्या आठवाड्याभरापासून स्वच्छतेचे महत्व एका कुत्र्यालाही पटले असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घंटा गाडीचा आवाज ऐकताच चक्क कुत्रा घरातून कचऱ्याची बकेट घेऊन येतो आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करतो. शहरातील गोकुळ धाम येथील हा व्हिडिओ आहे.

'या' व्हिडिओमुळे लातुरात स्वच्छता मोहिमेला गती

हेही वाचा -लातूरमधील केंद्रेवाडीत एकाच रात्री ६ सैनिकांच्या घरी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास

स्वच्छतेमध्ये लातूर महानगपालिकेला यंदाचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तेव्हापासून स्वच्छता विभागाचा उत्साह दुणावला असून या मोहिमेत सातत्य आहे. सकाळच्या प्रहरी स्वच्छतेतून समृद्धीकडे....चला लातूर स्वच्छ करूया... अशा प्रकारचे गाणे वाजवीत जनजागृती केली जाते.

हेही वाचा -बसवराज पाटलांच्या मतदारसंघात गोटेवाडीवासियांची फरफट, आमदारांनी दाखविलाच नाही 'विकासा'चा रस्ता

याची सवय एवढी झाली आहे की, गोकुळ धाम परिसरातील एक कुत्रा हे गाणे ऐकताच कचऱ्याची बकेट तोंडात घेतो आणि मनपाच्या घंटागाडीत टाकतो. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लातुरात व्हायरल होत आहे. किमान हे पाहून तरी लातूरकर स्वच्छतेला प्राधान्य देतील, असा विश्वास मनपाला आहे. त्यामुळेच मनपा आयुक्त एम. डी सिंह हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details