मुंबई- झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालयात सॅनेटरी नॅपकीन मशीन बसवण्यात येणार आहेत. २३५ सार्वजनिक शौचालयांत ५०० सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन्स आणि ५०० नग ऑटो कट ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इनसिनेरेटर्सचा पुरवठा पालिका करणार आहे. त्यासाठी पालिका ३ कोटी ७९ लाख ४२ हजार ७५० रुपये खर्च करणार असून त्यासाठी निविदा मागवल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
मुंबई; झोपडपट्ट्यांमधील शौचालयात मिळणार सॅनेटरी नॅपकीन - Sanitary napkins in slums mumbai news
सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीनमध्ये जाळून त्याचे राखेत रुपांतर करणे ही पध्दत उपलब्ध आहे. मात्र, सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होते. ही बाब पालिकेने विचारात घेऊन २३५ सार्वजनिक शौचालयांत ५०० सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन्स आणि ५०० नग ऑटो कट ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इनसिनेरेटर्सचा पुरवठा करणार आहे.
नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी सोय नाही -
झोपडपट्टयांमध्ये प्रत्येक घरात शौचालय बांधणे शक्य नसते. त्यामळे वस्त्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधली जातात. वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबईत विविध ठिकाणी ६५२ इतकी शौचालय बांधण्यात आलेली आहेत. झोपडपट्टयात सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सोय उपलब्ध नसते. अनेकदा वापरलेले नॅपकिन्स कचऱ्यात टाकले जातात. त्यामुळे रोगराई पसरणे तसेच जंतुसंसर्गाचा धोका होऊ शकतो. काहीवेळा हे नॅपकिन्स शौचकुपात टाकल्याने मलवाहिन्या तुंबणे, मलकुंड भरुन वाहने, अशा समस्या निर्माण होतात.
सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीन
सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर मशीनमध्ये जाळून त्याचे राखेत रुपांतर करणे ही पध्दत उपलब्ध आहे. मात्र, सॅनिटरी नॅपकिन्सची सुविधा उपलब्ध नसल्याने गैरसोय होते. ही बाब पालिकेने विचारात घेऊन २३५ सार्वजनिक शौचालयांत ५०० सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन्स आणि ५०० नग ऑटो कट ऑफ सॅनिटरी नॅपकिन्स इनसिनेरेटर्सचा पुरवठा करणार आहे. प्रत्येक व्हेंडिंग मशीनमध्ये ५०० सॅनिटरी नॅपकिन्स असतील. त्याचबरोबर ५० मेटालिक कॉइन्सचा देखील पुरवठा केला जाणार आहे. १ झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.