महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेळण्यातील वस्तूंचा वापर करून रसायनशास्त्राचे धडे केले सोपे; राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिकेचा अभिनव प्रयोग - Sangeeta Sohni, Chemistry Teacher

विद्यार्थ्यांना रयायन शास्त्राचे शिक्षण साध्या सोप्या पद्धतीने देण्यासाठी खेळणी आणि दैनदिन जीवनातील वापराच्या वस्तूंचा वापर प्रभावी करता यतो. हे मुंबईतील संगीता सोहनी या शिक्षिकेने दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी विविध रंगाचे चेंडू, रंगीबेरंगी बांगड्या, विविध रंगाचे आणि विविध आकारांची फुगे, विविध आकाराचे रिंग, रुमाल आदींचा त्यांनी वापर केला आहे. यासोबत प्रयोगशाळेतील विविध प्रकारच्या रसायनातून होणारे आविष्कार, आणि त्याला पेरियॉडिक टेबलचा आधार घेत त्यांनी रसायनशास्त्र हा विषयच सोपा करून केला आहे. यामुळे विद्यार्थांना यातून या रसायनशास्त्र या विषयाची गोडी लागली आहे.

teacher sangeeta sohani
खेळण्यातील वस्तूंचा वापर करून रसायनशास्त्राचे धडे केले सोपे

By

Published : Sep 23, 2020, 10:16 AM IST

मुंबई- अध्यापन करताना त्यात सहजता असेल तर विद्यार्थ्याचे अध्ययन व्यवस्थितरित्या होते. यासाठी काही अद्यापक, शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. शिक्षणामध्ये गणित, भूमिती आदी विषयानंतर सर्वात अवघड विषय म्हणून रसायनशास्त्र हा विषय समजला जातो. याचा धसका असंख्य विद्यार्थ्यांना कायमचाच असतो. परंतु याच विषयाची भीती घालवून त्याची गोडी लावण्यासाठी आणि हा विषय अत्यंत सहजपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक नवीन प्रयोग मुंबईतील शिक्षिका संगीता सोहनी यांनी विकसित केला आहे. त्यांच्या या प्रयोगाची देशस्तरावर दखल घेण्यात आली असून नुकतेच त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका संगीता सोहनी
रसायन शास्त्र म्हटले की, केवळ विविध रसायनांचे मिश्रण त्यातून होणारे विविध प्रयोग, अनेक प्रकारचे त्यातून येणारे गंध, त्याचा पसरलेला दरवळ याचा अभ्यास होय. हे सर्व शिकत असताना विषय थोडा क्लिष्ट वाटतो. मात्र विद्यार्थ्यांना हा विषय शिकवण्यासाठी शिक्षिका सोहनी यांनी विविध प्रकारांच्या खेळणी आणि वस्तूंच्या माध्यमातून अत्यंत सोपा केला आहे. यासाठी त्यांनी विविध रंगाचे चेंडू, रंगीबेरंगी बांगड्या, विविध रंगाचे आणि विविध आकारांची फुगे, विविध आकाराचे रिंग, रुमाल आदींचा त्यांनी वापर केला आहे. यासोबत प्रयोगशाळेतील विविध प्रकारच्या रसायनातून होणारे आविष्कार, आणि त्याला पेरियॉडिक टेबलचा आधार घेत त्यांनी रसायनशास्त्र हा विषयच सोपा करून केला आहे. यामुळे विद्यार्थांना यातून या रसायनशास्त्र या विषयाची गोडी लागली आहे.
खेळण्यातील वस्तूंचा वापर करून रसायनशास्त्राचे धडे केले सोपे
विद्यार्थ्यांना पीरियाडिक टेबल च्या माध्यमातून एलिमेंट्स, ऑक्सिजन आणि विविध प्रकारचे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यासंदर्भातील माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने कशी उपलब्ध होईल यासाठी संगीता सोहनी या शिक्षिकेने अभिनव असे शिकवणी पद्धतीत बदल केले असून त्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी खेळाची जोड दिली आहे. विद्यार्थ्यांना मनोरंजनातून आणि आनंदातून सहजपणे एखादा कठीण विषय कसा सोपा करून देता येतो यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाची कायमची मनातील भीती निघून गेली असल्याचे त्या सांगतात.

'मी लहानपणी रसायनशास्त्र हा विषय शिकताना मला अनेक प्रकारच्या अडचणी यायच्या, त्या अडचणी झाल्यानंतर दूर व्हाव्यात म्हणून मी विविध प्रकारचा विविध प्रकारचे प्रयोग सुरू केले. अनेक प्रकारच्या लहान खेळण्यांपासून टीचिंग याच नावाचा प्रयोग पहिला सुरू केला. केमिकलच्या एलिमेंटची नावे विद्यार्थ्यांना लक्षात राहावी म्हणून "नेम गेम" बनवला आणि त्यासाठी पिरीयाडिक टेबलचा आधार घेत विद्यार्थ्यांना हा विषय सोपा करून दिला'. या टेबलमधून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या नावाचे आठवण करून द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा हा विषय भक्कम बनत गेला. केवळ रसायनशास्त्र नाही तर विज्ञान आणि या सोबतच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या पीरियाडिक टेबलचा कसा लाभ होऊ शकतो, हे मी वेळोवेळी पटवून दिलं. रंगीबेरंगी फुगे यांचा वापर करून रसायन विज्ञान याची संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजावून दिली. स्माईल बॉल तसेच बांगडीच्या वापरापासून केमिकल बोर्डिंग कसे करता येते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले, असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, खेळण्यातील साधने वापरून रसायनशास्त्रातील विविध प्रयोग कसे सोपे करता येतात हे मी विद्यार्थ्यांना शिकवत राहिले. प्रयोगशाळेतील प्रयोगाची कधी भीती तर कधी कुतूहल असते. यामुळे ही भीती दूर करण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासमोर प्रयोग करून आणि त्यांना त्यामध्ये सामील करत त्यांची भीती दूर केली. रसायनशास्त्र हा विषय सोपा करून त्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग आणि गेम्स तयार केल्यामुळेच माझ्या या कामाची दखल देशस्तरावर घेण्यात आली. म्हणूनच मला नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते या विषयातील कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याची त्यांनी सांगितले.

विज्ञानाच्या क्षेत्रात काही प्रमाणात भीती असते ती भीती दूर होणे खूप आवश्यक असते. यासाठीच मी विविध प्रश्नांची डिझाईन करून त्यासाठीचा एक गेम ही तयार केला आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय लक्षात घेऊन 'टाईप ऑफ कार्ड' हा प्रयोग करून विविध प्रकारच्या रसायन आणि त्या रसायनांच्या मिश्रणासाठी याचा कसा वापर होऊ शकतो हे खेळण्याच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना शिकवले आणि त्याचा मोठा प्रभाव आज दिसत असल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत मोठा फरक पडला असून त्यांना या विषयाबद्दल एक आकर्षण निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details