महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोना योध्यांना 50 लाखांचे सुरक्षा कवच, ही घोषणा टीव्हीपुरती मर्यादीत' - कंत्राटी कामगार न्यूज

कोव्हिड योध्यांना 50 लाखांचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, ही घोषणा टीव्हीपुरती मर्यादीत राहिली असल्याचा आरोप मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे.

sandip deshpande c
संदिप देशपांडेंची मोदी सरकारवर टीका

By

Published : May 13, 2020, 6:54 PM IST

मुंबई - कोव्हिड योध्यांना 50 लाखांचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मात्र, ही घोषणा टीव्हीपुरती मर्यादीत राहिली असल्याचा आरोप मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. पालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात पालिका मुख्यालययाजवळ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या रिक्त जागा न भरता ही कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जात आहेत. पालिकेच्या सफाई कामगारांना ज्या सोयी-सुविधा दिल्या जातात, त्या कंत्राटदाराकडून कंत्राटी सफाई कामगारांना दिल्या जात नाहीत. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स, मास्क दिले जात नाही. जोखीम भत्ता दिला जात नाही. केंद्र सरकार नियमावलीनुसार विमासुद्धा काढला जात नाही. त्यामुळे कंत्राटी सफाई कर्मचारी नाराज आहेत. कंत्राटी सफाई कामगारांना कोरोनापासून वाचण्यासाठी सोयी सुविधा व सुरक्षा साधने देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, त्यावर प्रशासन गंभीर नसल्याने कंत्राटी सफाई कामगारांनी पालिका मुख्यालयाजवळ कचऱ्याच्या गाड्या आणून आंदोलन केले.



दरम्यान, या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असून, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेट घडवून आणण्यात आली. या भेटी दरम्यान झालेल्या चर्चेमधून कंत्राटी कामगारांना पीपीइ सुरक्षा किट, मास्क देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते न दिल्यास कनिष्ठ आवेक्षक (JO) यांच्यावर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या सफाई कामगारांना जोखीम भत्ता म्हणून 300 रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही जोखीम भत्ता दिला जाणार आहे. मात्र, या कामगारांना 50 लाखांचा विमा कवच देण्यास पालिका प्रशासनाने नकार दिला आहे.



विमा कवच घोषणा टीव्हीपुरती -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड योध्यांना 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता असे विमा कवच दिले जात नसल्याने ही घोषणा फक्त टीव्हीपुरतीच मर्यादित राहिली असल्याचा आरोप मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. सफाई कामगारांना पीपीई सुरक्षा किट आणि जोखीम भत्ता देण्याचे मान्य केले आहे. तसे पालिका प्रशासनाने लेखी दिले आहे. यामुळे हे आंदोलन स्थगित केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details