महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वडिलांसाठी मुलाचा त्याग, संदीप नाईक यांनी गणेश नाईकांसाठी सोडला मतदारसंघ

नवी दिल्लीत मंगळवारी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या यादीत गणेश नाईक यांना डावलण्यात आले. नाईक यांचे विरोधक मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघात कायम करण्यात आले, तर संदीप नाईक यांना ऐरोली मतदारसंघ देण्यात आला होता.

संदीप नाईक यांनी गणेश नाईकांसाठी सोडला मतदारसंघ

By

Published : Oct 2, 2019, 6:30 PM IST

मुंबई- मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात दिली. पण, त्यांना भाजपकडून त्यांचा बेलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही. त्यामुळे संदीप नाईक यांनी त्यांना देण्यात आलेला ऐरोली मतदारसंघ वडील गणेश नाईक यांच्यासाठी सोडून राजकीय त्याग केला आहे. नाराज गणेश नाईक यांना तातडीने भाजपच्या वतीने एबी फॉर्म ही देण्यात आला आहे.

हेही वाचा -गांधी जयंतीनिमित्त आझाद मैदान ते गेट ऑफ इंडियापर्यंत व्यसनमुक्तीसाठी रॅली

नवी दिल्लीत मंगळवारी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या यादीत गणेश नाईक यांना डावलण्यात आले. नाईक यांचे विरोधक मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघात कायम करण्यात आले, तर संदीप नाईक यांना ऐरोली मतदारसंघ देण्यात आला. यावर गणेश नाईक यांनी नाराजी व्यक करत तातडीने नवी मुंबई महानगर पालिकेतल्या आपल्या नगरसेवकांची बैठक बोलवली होती. नवी मुंबई परिसरात नाईक कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. नाईक कुटुंबीयांना डावलने भाजपसाठी योग्य नसल्याची जाणीव झाल्यानेच गणेश नाईक यांना भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आणि कोकण संघटन मंत्री सतीश धोंड यांनी एबी फॉर्म दिला असल्याचे चर्चिले जात आहे.

हेही वाचा - वयाचे कारण देऊन तिकीट कापले, बंडखोरी नाही - आमदार तारासिंग

दरम्यान, ज्या बेलापूर मतदार संघासाठी गणेश नाईक इच्छुक होते. नेमका तोच मतदारसंघ त्यांच्या विरोधक मंदा म्हात्रे यांना देण्यात आल्याने नाईक कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी सीबीडी बेलापूर येथील महापौर बंगल्यात गणेश नाईक समर्थक नगरसेवकांची बैठक पार पडली. आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत गणेश नाईक यांनी बेलापूर ऐवजी ऐरोलीतून निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details