मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. तर लोकांना माहिममध्ये बदल हवा. तो घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासून येत आहेत, असे मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
माहिममध्ये लोकांना बदल हवा - संदिप देशपांडे - इलेक्शन न्यूज लाइव
लोकांना माहिममध्ये बदल हवा. तो घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासून येत आहेत, असे मनसे उमेदवार संदीप देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
संदिप देशपांडे, मनसे उमेदवार
माहिम मतदारसंघातील मनसे उमेदवार संदीप देशपांडे हे त्यांच्या मतदान केंद्रात पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. माहिम मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे, अशी लढत या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे.