मुंबई :राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे हे गंभीर जखमी झाले असून; त्यांच्या हाताला आणि पायाला मार लागला आहे. हल्ल्यानंतर देशपांडे यांना तात्काळ मुंबईच्या हिंदूच्या रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही वेळातच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी या 'हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे'. असा गंभीर आरोप केला होता. आता संदीप देशपांडे आणि थेट पत्रकार परिषद घेत या स्टंपने हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांचा कोच कोण आहे याची आपल्याला माहिती असल्याचं म्हटलं आहे.
त्यांचा कोच कोण माहिती आहे :मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संधी देशपांडे म्हणाले की, 'मुंबई पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. मुंबई पोलीस तपास करत आहेत. मुंबई पोलीस आरोपींना शोधतील. पोलिसांना मी माझं स्टेटमेंट दिला आहे. जेव्हा आरोपी पकडले जातील त्यावेळी निश्चित मी या विषयावर सविस्तरपणे बोलेल. मला जे वाटतं ते मी पोलिसांना सांगितलेला आहे. सविस्तर जबाबामध्ये मी माहिती दिलेली आहे. मला मारणारे काय बोलले ते मी पोलिसांना जबाबात सांगितलेले आहे. आरोपींना अटक होऊ द्या त्यानंतर मी बोलेन. ज्या हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केला त्या हल्लेखोरांचा कोच कोण आहे त्याची आम्हाला पूर्ण माहिती आहे.'
मुख्यमंत्र्यांनी फोन करून चौकशी केली :पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, 'माझ्यावर हा हल्ला झाल्यानंतर जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मला फोन केला. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. यात फक्त एक पक्ष सोडून द्या. अगदी माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून माझी विचारपूस केली. या प्रकरणात मला सर्व ते सहकार्य करण्याचा आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. तसंच या घटनेनंतर राज ठाकरे त्यांच्या कुटुंबासह मला भेटायला आले, त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो.'
आता ज्यांनी हल्ला केला त्यांना सुरक्षा द्या : 'मुख्यमंत्र्यांनी जेव्हा मला फोन केला त्यावेळी त्यांनी मला भविष्यात असलेल्या धोका लक्षात घेता ताबडतोब दोन पोलीस माझ्या सुरक्षेसाठी पाठवले. त्यानंतर पुढच्या काही वेळात संरक्षण म्हणून दोन पोलीस माझ्या सोबत उपस्थित होते. इतकच नाही, तर मी ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटी बाहेर देखील काही पोलीस तैनात केले. माजी सरकारला विनंती आहे की, त्यांनी दिलेली जी सिक्युरिटी दिलेली आहे; ती त्याने परत घ्यावी आम्हाला संरक्षणाची गरज नाही. सरकारने मला जी सिक्युरिटी दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. मात्र आताही सिक्युरिटी त्यांनी ज्यांनी माझ्यावर हल्ला केलाय त्यांना द्यावी, आता खरी सुरक्षेची गरज त्या लोकांना आहे,' असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
हेही वाचा : Sandeep Deshpande Attack Case : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात दोघे ताब्यात, गुन्हे शाखेची मोठी कारवाई