महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एनसीबी'ने सॅम्युअल मिरांडाला चौकशीसाठी घेतले ताब्यात - सॅम्युअल मिरांडा चौकशी

आज एनसीबीकडून सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीच्या घरांवर आज (शुक्रवार) सकाळी छापे मारले. या दरम्यान त्यांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आल्याचे समजते. यावेळी सॅम्युअल मिरांडा ताब्यात घेतले असून सध्या त्याच्या घरी शोधमोहीम राबवली जात आहे.

sushant singh rajput case
सॅम्युअल मिरांडाला एनसीबीकडून अटक, मिरांडासह शोविक चक्रवर्तीच्या घरी छापा

By

Published : Sep 4, 2020, 8:03 AM IST

Updated : Sep 4, 2020, 5:44 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. आज सकाळी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरी एनसीबीने छापा टाकला. यावेळी एनसीबीच्या टीममध्ये काही महिला अधिकारीही होत्या. छापा टाकण्यात आल्यावर दोघांच्या घरांची झडाझडती घेण्यात आली. त्यानंतर मिरांडाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. त्याची तिथे चौकशी केली जात आहे.

सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीच्या घरी एनसीबीचा छापा, अधिकाऱ्यांची माहिती

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया, सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्तीचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनसीबीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. याच प्रकरणात जैद या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता अटक आरोपी जैदसोबत शोविक, रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअलचे काही संबंध आहेत का? याचा तपास एनसीबी करत आहे. त्यासाठी आज शोविक आणि सॅम्युअलच्या घरी छापा टाकला. सध्या सॅम्युअलच्या घरी तपास सुरू असून त्याला एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सॅम्युलला अटक करण्यासाठी एनसीबीकडे पुरावे असल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे.

एनसीबीने सॅम्युअल मिरांडाला घेतले ताब्यात, मिरांडासह शोविक चक्रवर्तीच्या घरी छापा

गेल्या काही दिवसांपासून चौकशीचा फास

गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्तीभोवती चौकशीचा फास आवळला आहे. ईडी, सीबीआय आणि नार्कोटिस्कची केंद्रीय टीम तिची सातत्याने चौकशी करत आहे. तसेच तिचे वडील इंद्रजित मुखर्जी आणि भाऊ शौविक मुखर्जी यांना बऱ्याच वेळा चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे रियाला कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

एनसीबीच्या कार्यालयात सॅम्युअल मिरांडाची चौकशी सुरू
Last Updated : Sep 4, 2020, 5:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details