मुंबई : समीर वानखेडे यांच्या चौकशी दरम्यान त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्याचप्रमाणे वानखेडे यांच्या विरोधात 11 मे ला सीबीआयने दिल्ली येथे हा गुन्हा नोंदवला. त्याचप्रमाणे त्यांच्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या घरांवर छापेमारी केली. कॉर्डेलिया क्रुझवरील छाप्यादरम्यान अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर, नार्कोटीक कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या इशाऱ्यावरून या प्रकरणात, पंच असलेल्या किरण गोसावी आणि सॅम्युअल डिसूजा यांनी शाहरुख खान याच्याकडे 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा उल्लेख सीबीआयने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे.
27 लोकांची नावे आली पुढे:त्याचप्रमाणे पंचवीस कोटी रुपयांचा हा सौदा 18 कोटींवर पक्का झाला. गोसावी आणि सॅम्युअल डिसूजा यांनी हे पैसे स्वीकारले. मात्र नंतर 50 लाख परत केले असे, सीबीआयने एफआर मध्ये नमूद केले आहे. याशिवाय कॉर्डिलिया क्रुझ वरील छाप्यादरम्यान 27 लोकांची नावे पुढे आली होती. मात्र, केवळ 17 लोकांना कोणत्याही लेखी नोंदी शिवाय सोडून दिले. तसेच दहा जणांना अटक केली असल्याचा देखील ठपका ठेवण्यात आला आहे.